उमरेडकरांनी जपलं ‘नातं’ रक्ताचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:06+5:302021-07-12T04:07:06+5:30

उमरेड : ‘भाऊ, मेरा नंबर कब आयेगा’ अशी हळुवार विचारणा करीत तासभर वेटींगवर राहून उमरेडकरांनी रविवारी ‘लोकमत रक्ताचं नातं’ ...

Umredkar chanted 'Natan' of blood | उमरेडकरांनी जपलं ‘नातं’ रक्ताचं

उमरेडकरांनी जपलं ‘नातं’ रक्ताचं

Next

उमरेड : ‘भाऊ, मेरा नंबर कब आयेगा’ अशी हळुवार विचारणा करीत तासभर वेटींगवर राहून उमरेडकरांनी रविवारी ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यव्यापी मोहिमेत सहभागी होत रक्ताचं नातं जपलं. महिला, पोलिसदादा, शिक्षक, डॉक्टर, कर्मचारी, व्यापारी, शेतमजूर साऱ्यांनीच रक्तदान करीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

स्थानिक आशीर्वाद मंगलम् येथे रविवारी सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महारक्तदान शिबिर यशस्वी पार पडले. लोकमत, उमरेड युथ फाऊंडेशन, शिवस्रेह गणेशोत्सव मंडळ, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टींग क्लब आणि फोटोग्राफर बहुद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन आ. राजू पारवे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, अनिकेत बहुद्देशिय संस्थेच्या संचालिका माधुरी भिवगडे, उमरेड युथ फाऊंडेशनचे संस्थापक अनिल गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, जितेंद्र गिरडकर, प्रशांत जयस्वाल, उमेश बोरकर, कृष्णकुमार मिश्रा, शरद मिरे आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी लोकमत सखी मंचच्या उमरेड संयोजिका स्व. संध्या खानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रक्तदानासह वृक्षरोपणाच्या संकल्पनेची प्रशंसा मान्यवरांनी केली. सर्वसामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचे आणि प्रश्न-समस्या मांडण्याचे कार्य लोकमत करीत आहे. शिवाय सामाजिक दायित्त्वाची जबाबदारी जोपासणाऱ्या संस्थांना सोबतीला घेत या नगरीत महारक्तदान शिबिराचा उपक्रम राबविणे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार राजू पारवे, सुधीर पारवे, विजयलक्ष्मी भदोरिया, गंगाधर रेवतकर, अनिल गोविंदानी यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अभय लांजेवार यांनी केले. संचालन रोशन पोकडे यांनी केले. आभार सतीश तांबेकर यांनी मानले. किशोर आदमने, रितेश राऊत, स्वप्नील लाडेकर, मुकेश गौतम, सुजन गौतम, राजू ढेबुदास, राजू चाचरकर, संतोष महाजन, स्वप्नील गवळी, आनंद पुनवटकर, सौरभ भिवगडे, नरेंद्र बालपांडे, गौरव राहाटे, समर भगत, संदीप देवाळकर, सतीश चकोले, प्रतीक चकोले, सौरभ वर्गणे, शुभम सिर्सीकर, दत्तू जिभकाटे, आशिष वंजारी, सुरेश देशमुख, विशाल बावणे, दर्शन गणवीर, आकाश महतो, केतन वाडीभस्मे, सचिन धारणे, अमोल परमारे, निशांत हजारे, सचिन चाचरकर, आकाश कुहीकर, स्वप्निल ब्रम्हे आदींनी सहकार्य केले.

------------------------------

यांचेही योगदान (----बॉक्स----)

रक्तदान शिबिरात उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, तहसीलदार प्रमोद कदम, राजाधिराज ढोलताशा पथक, विदर्भ ट्रॅकर्स, शिवशाही ग्रुप, लाईफ लाईन रक्तपेढी यांचेही योगदान मोलाचे ठरले. नगरसेविका रेणुका कामडी, जयप्रकाश वानखेडे, अरविंद हजारे, अनुराग बोकडे, प्रकाश मोहोड, श्वेता भिसे, श्वेता मोहोड, संगीता लांजेवार, सोनाली बासोडे, विजया गंधरवार आदींनीही हजेरी लावली.

वेटींग अन् सेल्फी पाॅईंट

सकाळपासूनच रक्तदात्यांची तुफान गर्दी होती. अशावेळी अनेकांना तासभर वेटींगवर राहावे लागले. अशातही रक्तदात्यांनी संयम ठेवत रक्तदान केले. प्रमाणपत्र आणि भेटवस्तूसह विशेष व्यवस्था केलेल्या सेल्फी पाॅईंटवर रोपटे देवून रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.

--

फोटो : उमरेड येथील महारक्तदान शिबिरात उपस्थित आ. राजू पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, माजी नगराध्यक्षा गंगाधर रेवतकर, माधुरी भिवगडे यांच्यासह अन्य मान्यवर आणि रक्तदाते.

Web Title: Umredkar chanted 'Natan' of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.