उमरेड डीव्हीआर चोरी प्रकरण : पीएसआय, नायब तहसीलदारवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:53 PM2019-05-31T22:53:21+5:302019-05-31T22:54:09+5:30

लोकसभा निवडणूक दरम्यान उमरेड येथील आयटीआयमधील तात्पुरत्या स्ट्राँग रुम परिसरातून डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी झाली होती. या प्रकरणात एक पीएसआय आणि नायब तहसीलदार यांच्यावर दोष निश्चित करण्यात आला असून दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.

Umrer DVR theft Case: Action will take against PSI, Naib Tehsildar | उमरेड डीव्हीआर चोरी प्रकरण : पीएसआय, नायब तहसीलदारवर होणार कारवाई

उमरेड डीव्हीआर चोरी प्रकरण : पीएसआय, नायब तहसीलदारवर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देशिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणूक दरम्यान उमरेड येथील आयटीआयमधील तात्पुरत्या स्ट्राँग रुम परिसरातून डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी झाली होती. या प्रकरणात एक पीएसआय आणि नायब तहसीलदार यांच्यावर दोष निश्चित करण्यात आला असून दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक लोकसभा मतदार संघात निवडणुकीदरम्यान उमरेड विधानसभा क्षेत्राकरिता येथील आयटीआय परिसरात तात्पुरती स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली होती. मतदानानंतर विधानसभा क्षेत्रातील सर्व ईव्हीएम येथे गोळा करण्यात आल्या. त्यानंतर सर्व ईव्हीएम कळमना एपीएमसी परिसरातील मुख्य स्ट्राँग रूम येथे हलविण्यात आल्या. ईव्हीएम हलविण्याच्या दोन-तीन दिवस आधी स्ट्राँग रूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दोन डीव्हीआर आणि एक दोन एलसीडी स्क्रीन चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी चोरीची तक्रार करण्यात आली. रामटेक येथील काँँग्रेसचे उमेवादर किशोर गजभिये यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे याची तक्रार केली. त्यानंतर दोनसदस्यीय चौकशी पथकाने परिसराची पाहणी करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मागविला. यात संपूर्ण प्रकरणासाठी पोलीस निरीक्षक आणि स्ट्राँग रुमची जबाबदारी असलेल्या नायब तहसीलदार यांना जबाबदार धरण्यात आले. या दोघांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Umrer DVR theft Case: Action will take against PSI, Naib Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.