प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 10:38 PM2022-07-14T22:38:07+5:302022-07-14T22:38:32+5:30

Nagpur News रस्ते अपघातात प्रियकराचा मृत्यू झाल्याचे दु:ख सहन न झाल्याने एका अल्पवयीन अभियांत्रिकी विद्यार्थिनीने रेस्टॉरंटच्या छतावर गळफास लावून आत्महत्या केली.

Unable to bear the shock of her lover's death, a minor student hanged herself | प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला गळफास

प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला गळफास

Next

नागपूर : रस्ते अपघातात प्रियकराचा मृत्यू झाल्याचे दु:ख सहन न झाल्याने एका अल्पवयीन अभियांत्रिकी विद्यार्थिनीने रेस्टॉरंटच्या छतावर गळफास लावून आत्महत्या केली. अंबाझरी उद्यानाजवळ ही घटना घडली. ती एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होती.

१४ एप्रिल रोजी तिच्या प्रियकराचा मृत्यू झाला. तेव्हापासून तिला मोठा धक्का बसला होता. ती कोणाशीही फारशी बोलत नव्हती. आईवडील गरीब आहेत. ते काम करतात. आईवडील गरीब कामगार आहेत. मुलीची मानसिक स्थिती त्यांना समजू शकली नाही. बुधवारी सकाळी वडील कामावर गेल्यानंतर आई घरीच होती. सकाळी ९.३० वाजता आई घराजवळील दुकानात सामान आणण्यासाठी गेली. याच दरम्यान विद्यार्थिनी घरातून निघून गेली.

अंबाझरी उद्यानाजवळ सौभाग्य रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटच्या मागे एक झाड आहे. मुलगी रेस्टॉरंटच्या छतावर चढली व तिने छतावरील झाडाच्या फांदीला दुपट्ट्याच्या साह्याने गळफास लावला. काही वेळाने परिसरातील एका व्यक्तीला तिचा मृतदेह लटकताना दिसला. त्याने रेस्टॉरंटचे संचालक कमलेश राऊत यांना या घटनेची माहिती दिली. कमलेशने लगेच अंबाझरी पोलीस ठाण्यात संपर्क केला. पोलिसांना तिच्या खिशातून सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख होता. तपासात पोलिसांना प्रियकराच्या मृत्यूने धक्का बसल्याचे समोर आले. एकुलत्या एक मुलीच्या आत्महत्येने पालकांनाही मोठा धक्का बसला आहे. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Unable to bear the shock of her lover's death, a minor student hanged herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू