‘सैराट’चे अनधिकृत प्रसारण पोलिसात तक्रार
By Admin | Published: May 6, 2016 03:02 AM2016-05-06T03:02:06+5:302016-05-06T03:02:06+5:30
बहुचर्चित मराठी चित्रपट ‘सैराट’चे अनधिकृत प्रसारण करणाऱ्या स्थानिक केबल वाहिन्यांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज ‘सैराट’ ...
नागपूर : बहुचर्चित मराठी चित्रपट ‘सैराट’चे अनधिकृत प्रसारण करणाऱ्या स्थानिक केबल वाहिन्यांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज ‘सैराट’ दिग्दर्शकांच्यावतीने वीरा उपाख्य विप्लव राऊफ साथीदार (वय ५६) यांनी गुरुवारी सायंकाळी अजनी पोलीस ठाण्यात दिला.
वीरा साथीदार यांच्या तक्रार अर्जानुसार, स्काय वाहिनी आणि जीटीपीएल केबलच्या संचालकांनी कोणतीही परवानगी न घेता बुधवारी दुपारी ३ वाजता सैराटचे अनधिकृतपणे वाहिनीवरून प्रसारण केले. त्याची माहिती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आपण दिली. त्यांनी चित्रपट प्रदर्शनाचे कोणतेही हक्क संबंधितांना नसताना त्यांनी हा गैरप्रकार केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्याची आपल्याला सूचना केली.
त्यावरून आपण हा तक्रार अर्ज पोलिसांकडे सादर करीत असल्याचे सांगून वीरा साथीदार यांनी संबंधित केबल वाहिन्यांच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नव्हती. (प्रतिनिधी)
—