नागपुरात अनधिकृत होर्डिंग्ज, बांधकामावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:51 AM2021-02-12T00:51:39+5:302021-02-12T00:58:20+5:30
Encroachment action महापालिकेच्या अतिक्रमणविराेधी पथकाने गुरुवारी नेहरूनगर आणि सतरंजीपुरा झाेनअंतर्गत अवैध हाेर्डिंग्ज हटविण्याची कारवाई केली. यासाेबत इतर झाेनमध्ये ३८० अतिक्रमण धारकांविराेधात कारवाई करून चार ट्रक सामान जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविराेधी पथकाने गुरुवारी नेहरूनगर आणि सतरंजीपुरा झाेनअंतर्गत अवैध हाेर्डिंग्ज हटविण्याची कारवाई केली. यासाेबत इतर झाेनमध्ये ३८० अतिक्रमण धारकांविराेधात कारवाई करून चार ट्रक सामान जप्त केले.
नेहरूनगर झाेनच्या मंगलमूर्ती हाॅल ते तिरंगा चाैक, सक्करदरा चाैक ते भांडेप्लाॅट व जगनाडे चाैकापर्यंत अवैध हाेर्डिंग्जसह ५२ अतिक्रमणे हटविली. सतरंजीपुरा झाेनअंतर्गत दही बाजार पूल ते राणी दुर्गावती चाैक, कांजी हाऊस चाैक ते वीट भट्टी चाैकपर्यंत अवैध हाेर्डिंग्ज आणि ५५ अतिक्रमणे हटविली. लकडगंज झाेनअंतर्गत वांजरा गावात प्रकाश चाैधरी, प्रमाेद मेश्राम, विजय घेंगे यांचे अवैध बांधकाम पाडले. यानंतर कळमना रेल्वे क्राॅसिंग ते चिखली रिंग राेडपर्यंत भाजी व फळे विक्रेत्यांची १२ दुकाने हटविण्यात आली. आसीनगी झाेनमध्ये वैशालीनगर ते कमाल चाैक ते आवळे बाबू चाैकपर्यंत ५२ अतिक्रमणे हटविली. लक्ष्मीनगर झाेनअंतर्गत रहाटे काॅलनी चाैक ते अजनी चाैक, विमानतळ ते प्रतापनगर चाैक व खामला चाैकापर्यंत ५४ अतिक्रमणे हटविली. धरमपेठ झाेनअंतर्गत आकाशवाणी चाैक ते जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीसीए स्टेडियम चाैक ते माऊंट राेडपर्यंत ५६ अतिक्रमण धारकांविराेधात कारवाई करण्यात आली. हनुमाननगर झाेनअंतर्गत तुकडाेजी पुतळा चाैक ते मानेवाडा राेड, ओमकारनगर चाैक ते शताब्दी चाैक, मनीषनगर चाैक ते मानेवाडापर्यंत ६८ अतिक्रमण धारकांवर कारवाई केली. यादरम्यान अतिक्रमण धारकांकडून तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
याशिवाय मंगळवारी झाेनअंतर्गत राजभवन चाैक ते सदर रेसीडेंसी राेड, स्मृती टाॅकीज ते लिबर्टी टाॅकीज चाैक, एलआयसी चाैक ते गड्डीगाेदाम चाैकपर्यंत रस्त्याच्या दाेन्ही भागातील ६८ अतिक्रमणे हटविली. ही कारवाई उपायुक्त महेश मोरोणे, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात झाली.