अनधिकृत भिंत, शेड तोडले; ४६० अतिक्रमणे हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:08 AM2021-02-11T04:08:28+5:302021-02-11T04:08:28+5:30

लोकमत न्युज नेटवर्क नागपूर :महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी गांधीबाग झोनमधील अवैध भिंत, शेड हटविण्याची कारवाई केली तर शहरातील ...

Unauthorized wall, shed broken; 460 encroachments deleted | अनधिकृत भिंत, शेड तोडले; ४६० अतिक्रमणे हटविले

अनधिकृत भिंत, शेड तोडले; ४६० अतिक्रमणे हटविले

Next

लोकमत न्युज नेटवर्क

नागपूर :महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी गांधीबाग झोनमधील अवैध भिंत, शेड हटविण्याची कारवाई केली तर शहरातील विविध भागांतील ४६० अतिक्रमणांचा सफाया केला. ५ ट्रक साहित्य जप्त करून ४२ हजारांचा दंड वसूल केला.

गांधीबाग घाट बाजार रोडवरील दोन अनधिकृत शेड हटविण्यात आली. चिटणवीसपुरा पोलीस चौकीच्या मागे गडर लाईनवर उभारण्यात आलेली भिंत तोडण्यात आली. त्यानंतर कोतवाली चौक ते बडकस चौक, लाकडी पूल व कल्याणेश्वर मंदिर परिसरातील ४४ अतिक्रमण हटविली. ७ हजारांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनमधील दही बाजार पूल ते मारवाडी चौक दरम्यानच्या मार्गावरील भाजीविक्रेते व ठेले हटविण्यात आले. त्यानंतर जैन घाटाजवळील एका इमारतीचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी पथक पोहोचले; परंतु घरमालकाने वेळ मागितल्याने १५ हजार दंड आकारून अतिक्रमण हटविण्यास मुदत दिली. नेहरूनगर झोनच्या पथकाने भांडे प्लाट चौक ते बॉलिवूड सेंटर पॉईंट हॉटेल, सक्करदरा चौक ते गजानन नगर व म्हाळगी नगर चौक दरम्यान ८८ अतिक्रमणे काढली.

हनुमाननगर झोनमधील तुकडोजी पुतळा चौक ते क्रीडा चौक, मेडिकल चौक ते परत झोन कार्यालय दरम्यान ५५ अतिक्रमण हटविले. धरमपेठ झोनमधील माटे चौक ते गोपालनगर, विजयनगर चौक ते अंबाझरी रोड, आयटी पार्क ते आठ रास्ता चौक, सावरकर चौक ते छत्रपती चौक व परत लक्ष्मीनगर चौकदरम्यान ५६ अतिक्रमण हटविले. एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. लकडगंज झोन क्षेत्रातील पारडी बाजार चौक ते अण्णाभाऊ साठे सभागृह, पंचशील बौद्धविहार ते भांडेवाडी चौकापर्यंत ४७ अतिक्रमण हटविले. यावेळी १५ अवैध शेड हटवून १० हजार रुपये दंड वसूल केला.

आसीनगर झोनमधील कमाल चौक ते वैशालीनगर चौक, रानी दुर्गावती चौक ते जयभीम चौकापर्यंत ५४ अतिक्रमण हटविले. मंगळवारी झोन क्षेत्रातील बेझनबाग ते कडबी चौक, बारा खोली वस्ती ते जरीपटका जिंजर मॉल, दयानंद पार्क ते नारा रोड पर्यंत ६२ अतिक्रमण काढून दंड वसूल केला. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त महेश मोरोणे, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: Unauthorized wall, shed broken; 460 encroachments deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.