अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर धडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:12 AM2021-08-27T04:12:21+5:302021-08-27T04:12:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित माेटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दाेघांपैकी एकाचा उपचाराला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित माेटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दाेघांपैकी एकाचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नुकतीच घडली.
राजकुमार हरलाल मरसकाेल्हे (२२, रा. द्रुगधामणा, ता. नागपूर ग्रामीण) असे मृताचे तर नीतेशकुमार रामदयाल रहांगडाले (१८, रा. कल्याणपूर, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) असे जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते एमएच-४०/बीपी-६४७२ क्रमांकाच्या माेटरसायकलने जबलपूरहून नागपूरला येत हाेते. ते पवनी (ता. रामटेक) शिवारात पाेहाेचताच राजकुमारचा माेटरसायकलवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित माेटरसायकल दुभाजकावर धडकली.
यात राजकुमारच्या डाेक्याला तर नीतेशकुमारच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली. दाेघांना देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती राजकुमारला मृत घाेषित केले. नीतेशकुमारवर उपचार सुरू असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार गाेपीचंद कांबळे करीत आहेत.