अनियंत्रित वाहन उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:00+5:302021-08-17T04:14:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क धामणा : चालकाला झाेपेची डुलकी आल्याने वेगात असलेले छाेटे मालवाहू वाहन अनियंत्रित झाले आणि दुभाजकावर आदळून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
धामणा : चालकाला झाेपेची डुलकी आल्याने वेगात असलेले छाेटे मालवाहू वाहन अनियंत्रित झाले आणि दुभाजकावर आदळून राेडवर उलटले. यात चालक व क्लिनरला किरकाेळ दुखापत झाली असून, वाहनातील भाजीपाला राेडवर विखुरला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा शिवारात रविवारी (दि. १५) सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये वाहनचालक यशवंत सारवे (२४, रा. जालना) व क्लिनर लहू गवळे (२०, रा. काजगाव, जिल्हा जालना) या दाेघांचा समावेश हाेता. हे दाेघेही एमएच-२१/बीएच-३४९५ क्रमांकाच्या छाेट्या मालवाहू वाहनाने भाजीपाला घेऊन जालना येथून अमरावती-नागपूर मार्गे भंडारा येथे जात हाेते. दरम्यान, धामणा (ता. नागपूर ग्रामीण) शिवारात यशवंतचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन दुभाजकावर आढळून राेडवरच उलटले.
झाेपेची डुलकी आल्याने हा अपघात झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही जखमींना नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले. उपचार केल्यानंतर दाेघांनाही सुटी देण्यात आली. याप्रकरणी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
भाजीपाला नागरिकांच्या घरी
या वाहनात टाेमॅटाे, शिमला मिरची, वालाच्या शेंगा व मिरची हाेती. वाहन उलटताच वाहनातील भाजीपाला राेडवर विखुरला. त्यातच राेडने जाणाऱ्या-येणाऱ्यांनी राेडवरील भाजीपाला उचलून आपापल्या घरी नेला. त्यामुळे या अपघातात वाहनासाेबतच भाजीपाल्याचेही नुकसान झाले, अशी माहिती वाहनचालक यशवंत सारवे याने दिली.