भीतीच्या छायेखाली; आता भूकेचे संकट; भारत-बांगलादेश सीमा ‘सील’; व्यापार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:57 AM2024-08-06T05:57:03+5:302024-08-06T05:57:13+5:30

तिथे खाद्यान्नाचे दर आकाशाला भिडणार  असल्याने त्यांच्यासमाेर भुकेचे आव्हान उभे ठाकणार आहे.

Under the shadow of fear; Now the crisis of hunger; India-Bangladesh border 'sealed'; Trade stopped | भीतीच्या छायेखाली; आता भूकेचे संकट; भारत-बांगलादेश सीमा ‘सील’; व्यापार ठप्प

भीतीच्या छायेखाली; आता भूकेचे संकट; भारत-बांगलादेश सीमा ‘सील’; व्यापार ठप्प

सुनील चरपे

नागपूर : बांगलादेशात यादवी माजली असून, पंतप्रधान शेख हसीना पळून जाताच लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. बांगलादेशने भारताच्या सीमा साेमवारी सायंकाळी सील केल्या आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने भारतातून हाेणारी निर्यात थांबल्याने भारतीय शेतमाल निर्यातदारांनी सध्या ‘वेट ॲण्ड वाॅच’ची भूमिका घेतली आहे. तिथे खाद्यान्नाचे दर आकाशाला भिडणार  असल्याने त्यांच्यासमाेर भुकेचे आव्हान उभे ठाकणार आहे.

बांगलादेश भारताकडून बटाटे वगळता तांदूळ, गहू, आटा, डाळी, बेसन, फळे, भाजीपाला, कांदा व इतर शेतमाल आयात करतात. या वस्तूंची भारतातून बांगलादेशात हाेणारी निर्यात किमान ७५ टक्के आहे. मात्र हिंसाचारानंतर ही निर्यात थांबली आहे., अशी माहिती भारतीय शेतमाल निर्यातदारांनी दिली. १५ दिवसांपूर्वीच बंदलावर ८०० ट्रक अडकून पडले होते.

 दरवाढीला सुरुवात

बांगलादेशात पुरवठा थांबल्याने खाद्यान्नाचा तुटवडा निर्माण हाेऊन दरवाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांना भारताशिवाय इतर देशांकडून तातडीने शेतमालाची आयात करणे शक्य नाही. त्यामुळे आपण सध्या ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत आहाेत, अशी माहिती भारतीय निर्यातदारांनी दिली.

‘टका’चे अवमूल्यन व काळाबाजार

निर्मित परिस्थितीमुळे बांगलादेशी चलन ‘टका’चे ४८ तासांत ३० टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. बांगलादेशात शेतमालाच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सध्या बांगलादेशात ज्या व्यापाऱ्यांकडे शेतमालाचा थाेडाफार साठा आहे, ते अधिक दाराने विक्री करीत आहेत. हीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास शेतमालाचा काळाबाजार व किमतीने दुपटीपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

दूरगामी परिणाम

nबांगलादेशाची अर्थव्यवस्था कापड उद्याेगावर अवलंबून आहे. मात्र आताबांगलादेशच्या कापड निर्यात व अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम हाेणार आहे.

nयादवीमुळे बांगलादेशचे ९० टक्के, तर भारताचे १० टक्के आर्थिक नुकसान झाले आहे. कापड निर्यातीत बांगलादेशचा वाटा २४ टक्के आहे.

nयादवीमुळे ही आयात आणि त्यांची कापड निर्यात प्रभावित झाली आहे. याचा फायदा भारतीय कापड निर्यातदारांना नक्की हाेऊ शकताे.

Web Title: Under the shadow of fear; Now the crisis of hunger; India-Bangladesh border 'sealed'; Trade stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.