नागपुरातील  आव्हाने समजून घेऊन ती सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:30 PM2018-05-05T15:30:05+5:302018-05-05T15:30:29+5:30

शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सोबतच पायाभूत विकासही व्हायला हवा. दोन्ही गोष्टीला पहिली प्राथमिकता राहील. अगोदर शहरातील समस्या व त्यासमोरील आव्हाने समजून घेईल, त्याचे अध्ययन करेल आणि त्यानंतरच त्या सोडविल्या जातील, असा विश्वास मनपाचे नवनियुक्त आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Understanding the challenges of Nagpur will solve it | नागपुरातील  आव्हाने समजून घेऊन ती सोडवणार

नागपुरातील  आव्हाने समजून घेऊन ती सोडवणार

Next
ठळक मुद्देवीरेंद्र सिंग : मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सोबतच पायाभूत विकासही व्हायला हवा. दोन्ही गोष्टीला पहिली प्राथमिकता राहील. अगोदर शहरातील समस्या व त्यासमोरील आव्हाने समजून घेईल, त्याचे अध्ययन करेल आणि त्यानंतरच त्या सोडविल्या जातील, असा विश्वास मनपाचे नवनियुक्त आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
वीरेंद्र सिंग यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडून मनपा आयुक्ताचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मनपा प्रमुखांची बैठक घेतली. त्यांना शहरातील समस्या व आव्हाने कोणकोणती आहेत याची माहिती द्यावी, असे निर्देश दिले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग म्हणाले, विभाग प्रमुखांकडून शहरातील समस्या व त्या सोडविण्यासाठी असलेली आव्हाने याबाबतची माहिती मागविली आहे. त्याचा अभ्यास करून त्या सोडविण्याची रुपरेषा ठरविली जाईल. आज पहिलाच दिवस आहे. मनपातील परिस्थिती समजून घेतल्यानंतरच पुढे काय करायचे ते ठरवू. बेस्ट देण्याचा प्रयत्न करू, इतके मात्र निश्चित. अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक आणि सामान्य जनतेमध्ये चांगला समन्वय स्थापित करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. यामुळे समस्या सोडविण्यात सोपे जाईल.
नागरिकांचे भले करता येईल. नागपूर शहराला आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यानुसार बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम राज्यातील २४० नगरपालिकांमध्ये अमलात आणण्यात आली आहे. ती टप्प्याटप्प्याने महापालिकेतही लागू करण्यात येईल.
मनपा आयुक्तांचा पदभार स्वीकारण्यापूर्वी वीरेंद्र सिंग हे नगरपालिका प्रशासन मुंबई येथे संचालक व आयुक्त पदावर कार्यरत होते. २००६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सिंग यांनी जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुरुवात केली. यानंतर जिल्हा परिषद बीड आणि सोलापूरचे सीईओ राहिले. सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणूनही कार्य केले.
फाईल लटकवून ठेवण्याची प्रवृत्ती संपवू
सिंग यांनी सांगितले की, फाईल लटकवून ठेवण्याची प्रवृत्ती सोडायला हवी. कोणत्याही कामाचा रिझल्ट फास्ट असावा. आता ‘वेब बेस्ड सिस्टीम’ येत आहे. मनपातही अशी प्रणाली अमलात आणली जाईल. आयटीटी माहिती असल्याने त्याचा उपयोग करून कार्यप्रणाली अधिक सहज करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री-गडकरींचा दबाव नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर शहरातील असल्याने काही मानसिक दबाब आहे का, अशी विचारणा काही पत्रकारांनी केली असता ते म्हणाले, त्यांच्या मार्गदर्शनात काम करणे हे माझे ‘लक’ आहे. दबावाचा प्रश्नच निर्माण होत नाही. माझ्यापूर्वी येथे जे आयुक्त राहिले आहेत त्यांनी माझ्यापेक्षाही चांगले काम केले आहे. मी सुद्धा चांगले काम करण्याचा प्रयत्न करेल.

Web Title: Understanding the challenges of Nagpur will solve it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.