५९ भूखंड विकणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Published: July 30, 2016 02:23 AM2016-07-30T02:23:52+5:302016-07-30T02:23:52+5:30

बनावट अकृषक परवान्यावर उमरेड मार्गावरील कळमना येथील ५९ भूखंड विकून १ कोटी ३५ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या....

Undisclosed foreclosure of sellers of 59 plots | ५९ भूखंड विकणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

५९ भूखंड विकणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next

न्यायालय : एक कोटीवर रकमेने फसवणूक
नागपूर : बनावट अकृषक परवान्यावर उमरेड मार्गावरील कळमना येथील ५९ भूखंड विकून १ कोटी ३५ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे सहायक सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
नरेंद्र हेमंत पराते, असे या सूत्रधाराचे नाव आहे.
प्रकरण असे की, नरेंद्र पराते, उमाकांत विठ्ठलराव मेंढे आणि हर्षद प्रभाकर चिखले यांनी हनुमाननगर क्रीडा चौकात ‘घरकुल इन्फ्राटेक’ या नावाने भूखंड विकण्याचे दुकान थाटले होते. त्यांनी उमरेड मार्गवरील कळमना येथील खसरा क्रमांक ११६ आणि पहिला हलका क्रमांक ३६ मधील १ लक्ष ४३ हजार १६१ चौरस फूट जागेवर निरनिराळ्या लांबी व रुंदीचे ५९ ले-आऊट पाडले. प्रत्यक्षात ही जमीन गावठाणापासून ५०० मीटरच्या दूर असून त्याची अकृषक परवानगी मिळत नाही. या आरोपींनी ही जमीन अकृषक करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासचे बनावट सही व शिक्क्यानिशी शिफारसपत्र तयार केले होते. ते जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून हे शिफारसपत्र आणि अकृषकचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजात समाविष्ट करण्यात आला होता. त्यावर अकृषकचा परवाना प्राप्त करून या अकृषक परवान्याचा आधार घेऊन त्यांनी भूखंड विकण्याचा सपाटा सुरू केला होता. या गैरप्रकारात नासुप्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या आरोपींनी महाल येथील अनंता मनोहर राहाटे यांना प्लॉट नंबर ४ हा २ हजार ४२१ चौरस फुटाचा भूखंड विकण्याचा सौदा करून त्यांच्याकडून ३ लाख ३०० रुपये घेतले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावर १५ जून रोजी भादंविच्या ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४०६, ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी ५९ भूखंड विकून रीतसर रजिस्ट्री करून देऊन शासनाची आणि भूखंड घेणाऱ्यांची फसवणूक केली आहे.
आरोपींपैकी नरेंद्र पराते याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. प्रकरण गंभीर असल्याने त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले.
पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Undisclosed foreclosure of sellers of 59 plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.