कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर बेरोजगारीची कुºहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:22 AM2017-11-04T00:22:15+5:302017-11-04T00:22:34+5:30
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर रक्त व इतर नमुने तपासून आजाराचे निदान लावणाºया कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर अचानक बेरोगजगारीचे संकट कोसळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर रक्त व इतर नमुने तपासून आजाराचे निदान लावणाºया कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर अचानक बेरोगजगारीचे संकट कोसळले आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून सेवा देणाºया या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिल्याने राज्यातील ७१२ कर्मचाºयांची सेवा संपली आहे. रोजगार देण्याचा दावा करणाºया सरकारकडून असलेला बेरोजगारीच्या अंधारात ढकलण्यात आल्याचा आरोप या कर्मचाºयांनी केला आहे.
नागपूर जिल्ह्यातील बेरोजगार झालेल्या या कर्मचाºयांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांना निवेदन सोपविले. शिष्ठमंडळातील प्रतिनिधी रोहित जयस्वाल यांनी सांगितले की, राष्टÑीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) अंतर्गत २००७ पासून पीएचसीमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होत आहेत. त्याअंतर्गत दरवर्षी त्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात येते. यावर्षीही एप्रिल २०१७ मध्ये या कर्मचाºयांचे कंत्राट रिन्यू झाले असून मार्च २०१८ पर्यंत त्यांच्या नियुक्तीची मुदत आहे. मात्र राज्य शासनाने मुदतीपूर्वीच ३१ आॅक्टोबरला प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदे नामंजूर करून या सर्व कर्मचाºयांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश काढले. त्यामुळे हे सर्व कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांना कायम करण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाने समान काम समान वेतन या तत्त्वावर त्यांना सामावून घेण्याचे आदेश दिले होते व त्यानुसार एका समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र शासनाने त्यापूर्वीच नियुक्त रद्द करून त्यांच्यावर संकट ओढवल्याचे रोहित जयस्वाल यांनी सांगितले. गेल्या १० वर्षापासून हे कर्मचारी केवळ ८००० रुपये या नाममात्र वेतनावर सेवा देत आहेत. याअंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांचे मलेरिया तपासणीसह टीएलसी, डीएलसी, एचबी, प्लेटलेट्स, एचआयव्ही, ब्लड शुगर, हिपॅटेटीस, स्पुटॉन, व्हिडॉल, आरडीके, युरीन मायक्रोस्कोपी, बीटी/सीटी, युपीटी आदी आजारांची तपासणी करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात होते. या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द केल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे. या कर्मचाºयांना सात दिवसात पूर्ववत कामावर न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आमरण उपोषण करण्याचा इशारा या कर्मचाºयांनी दिला आहे. शिष्टमंडळात मनोज शिवणकर, शुभांगी साठवणे, श्रद्धा दरेकर, शितल ठेलकर, प्रीती शिरपूरकर, दर्शना निव्वळ, पांडुरंग नौकरकर, विजया तलमले, परिना शेख आदींचा समावेश होता.