मुद्रा योजनेमुळे बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:47 AM2017-10-08T01:47:59+5:302017-10-08T01:48:10+5:30

देशात कृषीच्या समस्येनंतरची सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारीची असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर हाथ को काम, हर खेत को पानी’ या संकल्पनेनुसार मुद्र्रा योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना ....

Unemployment opportunity for self-employment | मुद्रा योजनेमुळे बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

मुद्रा योजनेमुळे बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

Next
ठळक मुद्दे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर : मुद्रा प्रोत्साहन अभियानाचे उद्््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात कृषीच्या समस्येनंतरची सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारीची असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर हाथ को काम, हर खेत को पानी’ या संकल्पनेनुसार मुद्र्रा योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना स्वयंरोजगार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे केले.
मुद्रा कर्ज योजनेचा प्रसार व्हावा, या उद्देशाने राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित ‘मुद्रा प्रोत्साहन अभियाना’चे उद्घाटन करताना केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभेचे खासदार अजय संचेती, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आर.के. गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधानांनी जन-धन योजना, विमा योजना, पीक विमा योजना यासारख्या अनेक योजना हाती घेतल्या असून, त्यातील मुद्रा योजनेमुळे बेरोजगारीचा गंभीर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे नोकर कपात होत असताना स्वयंरोजगारनिर्मिती हे बेरोजगारीचे आव्हान पेलू शकते. तरुणांनी स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजनेचा लाभ घेऊन इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावेत. ग्रामीण भागात परंपरागत शेती व्यवसायासोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय यासारख्या पूरक व्यवसायाची कास शेतकºयांनी धरावी. त्याकरिता मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. या जोडधंद्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वासही अहीर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मुद्रा योजनेंतर्गत व स्टॅन्ड अप इंडिया योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण करण्यात आले. राजकुमार जगने, प्रशांत हाडके, शंकर उमरेडकर, प्रवीण कांबळे, कुंजन पटेल, विनायक इंगोले यांना मुद्रा योजनेच्या ‘शिशू, किशोर व तरुण’ या श्रेणीतील कर्जाचे मंजूरपत्र वितरित करण्यात आले. मुद्रा योजनेचे लाभार्थी प्रदीप मेश्राम व स्टॅन्ड अप इंडिया योजनेच्या लाभार्थी निशिगंधा राऊत यांनी योजनेसंदर्भात अनुभव विशद केले. प्रास्ताविक आर.के. गुप्ता यांनी केले.
तालुकास्तरावरही अभियान राबवा
याप्रसंगी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी अशाप्रकारचे मुद्र्रा प्रोत्साहन अभियान जिल्हा प्रशासन व बँकेच्यामार्फत तालुका व तहसीलस्तरावरही आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या योजनेची फलश्रुती लाभार्थ्यांनी त्यांच्या कर्जाच्या परतफेडीवर अवलंबून आहे, त्यामुळे इतरांना कर्ज मिळण्याची संधी मिळेल, या बाबीचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
मुद्रा योजनेची यशोगाथा
याप्रसंगी नागपुरातील मुद्रा योजनेंतर्गत विविध लाभार्थ्यांची यशकथा चित्रफितीद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आल्या. डिजिटल बँकिंग व्यवहारांना चालना मिळण्याच्या हेतूने ‘भीम अ‍ॅपचे (भारत इंटरफेस फॉर मनी) प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आले. याप्रसंगी विविध बँकांच्या मुद्रा योजना लाभार्थ्यांच्या यशकथा समाविष्ट असणाºया ‘यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही अहीर यांच्या हस्ते करण्यात आले.
नोटाबंदी देशासाठी लाभदायक
जी मंडळी कालपर्यंत समर्थन करीत होती ती आज विरोध करीत आहेत. परंतु नोटाबंदीमुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठा फायदा झाला आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले.
...तर तो गुन्हा ठरेल
मुद्रा योजनेचा कार्यक्रम हा पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रीय बँक अधिकाºयांनी हजर असणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही, याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या योजनेंतर्गत अर्ज करणाºया प्रत्येकाला कर्ज हे सुलभपणे मिळावे, ही बँकेच्या अधिकाºयांची जबाबदारी आहे. अधिकारी आपल्या खिशातून कर्ज देत नाही, तेव्हा अर्ज करणाºयाला कर्ज मिळालेच पाहिजे. तसे होत नसेल तर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण केल्यासारखे होईल आणि तो मोठा गुन्हा ठरेल, असा इशाराही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी बँकेच्या अधिकाºयांना दिला. तसेच कर्जाची परतफेड करण्याबाबत अधिकारी उदासीन असतात, ही उदासीनता झटकून फिल्डमध्ये जाऊन कर्तव्य बजावावे, अशी सूचनाही केली.
 

Web Title: Unemployment opportunity for self-employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.