नागपुरात विजेच्या धक्क्याने पेंटरचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 08:39 PM2018-04-11T20:39:59+5:302018-04-11T20:40:09+5:30

पेंटिंगचे काम करीत असताना एका पेंटरला विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी हुडकेश्वर ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

The unfortunate death of the painter in Nagpur by electric shock | नागपुरात विजेच्या धक्क्याने पेंटरचा दुर्दैवी मृत्यू

नागपुरात विजेच्या धक्क्याने पेंटरचा दुर्दैवी मृत्यू

Next
ठळक मुद्देभाग्यश्रीनगर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : पेंटिंगचे काम करीत असताना एका पेंटरला विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी हुडकेश्वर ठाण्यांतर्गत उघडकीस आली. मो. कासीम वल्द मो. रहेमतुल्ला अन्सारी (५५) रा. रोशनबाग, नंदनवन असे मृत पेंटरचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
भाग्यश्री नगर येथे कासीम हा पेंटिंगच्या कामावर होता. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान काम करीत असताना विद्युत प्रवाह असलेल्या विजेच्या तारांना कासीम यांचा स्पर्श झाल्याने ते दूर फेकले गेले. बेशुद्ध अवस्थेत कासीम यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी मिळालेल्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
युवकासह दोघांचा मृत्यू
कोतवाली व प्रतापनगर ठाण्यांतर्गत वेगवेगळ्या घटनांमध्ये युवकासह दोघांचा अकस्मात मृत्यू झाला.
पहिल्या घटनेत कोतवाली येथील एस. डी. हॉस्पिटल, तेजस्विनी विद्या मंदिर समोर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान संदीपसिंग महेशलाल सिंग (४२) हे मृतावस्थेत आढळून आले. दुसऱ्या घटनेत प्रतानगर ठाण्यांतर्गत लोखंडे नगर परिसरात राहणारे गौरव हुडकराम गजघाटे (३१) हा युवक मंगळवारी दुपारी ३ ते ३.२० वाजताच्या दरम्यान बेशुद्ध अवस्थेत राहत्या घरी आढळून आला. त्याला कुटुंबीयांनी पडोळे रुग्णालयात दाखल केले असता गौरवचा रात्री ९ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणी संबंधित ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The unfortunate death of the painter in Nagpur by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.