केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरातूनच लढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 06:26 AM2024-03-03T06:26:04+5:302024-03-03T06:26:30+5:30

 माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, गडकरी यांच्याबाबत संभ्रम पसरविणारा एक व्हिडीओ चिटिंग करून व्हायरल केला जात आहे. त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

Union Minister Gadkari will contest from Nagpur itself; Information of Chandrasekhar Bawankule | केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरातूनच लढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरातूनच लढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळेल की नाही, याबाबतच्या शंका-कुशंकांना आता पूर्ण विराम लागला आहे. गडकरी हे नागपुरातूनच लढतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी स्पष्ट केले. 

 माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, गडकरी यांच्याबाबत संभ्रम पसरविणारा एक व्हिडीओ चिटिंग करून व्हायरल केला जात आहे. त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ५ मार्चला अकोला येथे बैठक होणार आहे. त्यामध्ये ते चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ-वाशिम, अमरावती, अकोला व बुलढाणा या मतदारसंघांचा आढावा घेतील, असेही बावनकुळे म्हणाले.

नवनीत राणांचा पक्षप्रवेश नाही
४ मार्चला नागपुरात आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा सहभागी होतील. पण त्याठिकाणी पक्ष प्रवेशाचा सोहळा नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचे उमेदवार धनुष्यबाण तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढतील, असेही बावनकुळे म्हणाले. 

कदमांच्या वक्तव्यावर शिंदे निर्णय घेतील
भाजप छोटे पक्ष संपवत आहे, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वक्तव्याबाबत बावनकुळे म्हणाले की, कदम यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. त्यांचे व्यक्तिगत मत हे महायुतीचे मत होऊ शकत नाही.
 

Web Title: Union Minister Gadkari will contest from Nagpur itself; Information of Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.