दीर्घायुष्‍यासाठी आयुर्वेद स्‍वीकारा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

By जितेंद्र ढवळे | Published: November 5, 2023 03:50 PM2023-11-05T15:50:22+5:302023-11-05T15:51:45+5:30

‘हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद' ही यावर्षीच्‍या आयुर्वेद दिनाची संकल्‍पना आहे. 

Union Minister Nitin Gadkari appeals to embrace Ayurveda for longevity | दीर्घायुष्‍यासाठी आयुर्वेद स्‍वीकारा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

दीर्घायुष्‍यासाठी आयुर्वेद स्‍वीकारा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूर : आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्‍कृती असून त्‍याला जगात मान्‍यता म‍िळालेली आहे. पंचकर्माला जगात मोठी मागणी आहे. आयुर्वेद केवळ चिक‍ित्‍सा पद्धती नसून आपली जीवनशैली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

केंद्र सरकारच्या  आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेद्वारे संचालित क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थानच्‍या वतीने 8 व्‍या आयुर्वेद दिनाचे औचित्‍य साधून नागपुरात रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. ‘हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद' ही यावर्षीच्‍या आयुर्वेद दिनाची संकल्‍पना आहे. 

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण संस्था, क्रीडा चौक येथून द्रोणाचार्य पुरस्‍कार विजेते प्रशिक्षक विजय मुनिश्वर, आशियाई स्‍पर्धांमध्‍ये सुवर्णपदक पटकावणारी अल्फिया पठाण, आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे सायकलपटू अमीत समर्थ, ईश्वर देशमुख कॉलेजचे प्राचार्य एस. नायडू, राधाकृष्‍णन हॉस्पिटलचे अध्‍यक्ष डॉ. पोतदार यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करण्‍यात आला. यावेळी गडकरी यांनी व्हिडिओच्‍या माध्‍यमातून रॅलीला शुभेच्‍छा दिल्‍या. ‍ यावेळी क्षेत्रीय आयुवेद‍िक अनुसंधान संस्‍थानचे सहायक संचालक डॉ. म‍िलिंद सुर्यवंशी यांची उपस्‍थ‍िती होती.

‘रोग अनेक उपाय एक – आयुर्वेद’, ‘दीर्घायुष्‍यासाठी आयुर्वेद स्‍वीकारा’ असा संदेश देत रविवारी  ईश्‍वर देशमुख शारीर‍िक शिक्षण महाविद्यालयाच्‍या परिसरातून आयुर्वेद रथयात्रा व रॅली निघाली. विविध आयुर्वेद संस्‍था व विद्यार्थ्‍यांचा रॅलीला उत्‍स्‍फूर्त प्रति‍साद लाभला. 

हजारोंचा सहभाग 
आयुर्वेदाच्‍या प्रचार व प्रसारासाठी काढण्‍यात आलेल्‍या रॅलीमध्‍ये आयुर्वेदाचा इत‍िहास उलगडणारे  व आयुर्वेदाचा संदेश देणारे बैद्यनाथ, दत्‍ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, आयुर्वेद व्‍यासपीठ अशा विविध आयुर्वेद‍िक संस्‍थांचे चित्ररथ सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, माजी खा. डॉ. विकास महात्मे, दत्‍ता मेघे आयुर्वेद कॉलेजचे डॉ. मनीष देशमुख, नीरीचे डॉ. कृष्‍णमूर्ती व डॉ. म‍िल‍िंद सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्‍युपिटर आयुर्वेद कॉलेजला प्रथम, भाऊसाहेब मुळक केडीके  कॉलेज बुटीबोरीला द्व‍ितीय तर दत्‍ता मेघे कॉलेज वानाडोंगरीला तृतीय पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले.

Web Title: Union Minister Nitin Gadkari appeals to embrace Ayurveda for longevity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.