बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाविरुद्ध युनियनची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 08:17 PM2019-10-05T20:17:47+5:302019-10-05T20:20:07+5:30
बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाच्या कर्मचारीविरोधात भेदभावपूर्ण धोरणाबाबत बँकेच्या कर्मचारी युनियनने शनिवारी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाच्या कर्मचारीविरोधात भेदभावपूर्ण धोरणाबाबत बँकेच्या कर्मचारी युनियनने शनिवारी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. विदर्भ क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. निदर्शने देशभरातील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आयोजित केली होती.
स्टाफ युनियनचे महासचिव सुरेश बोभाटे यांनी सांगितले की, बँकेच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना केवळ दोन लिटर पेट्रोलची वाढ करुन कर्मचाऱ्यांचा अपमान केला आहे. बँकेने अधिकारी २० लिटर पेट्रोल व्यय स्वीकृत करून भेदभाव केला आहे. बँकेच्या लाभात आणि कार्यात कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समान वाटा आहे. परंतु बँकेने असा भेदभाव करून फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निषेध करीत आहे. बँकेने या मनमानी निर्णयात फेरबदल केला नाही तर देशभरात बँकेच्या धोरणाविरुद्ध संप केला जाईल.
आंदोलन आणि निदर्शनात बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी दिलीप चौधरी, हेमंत हरिरामानी, प्रदीप गौर, अशोक शेंडे, नारायण उमरेडकर, योगेश समुंद्रे, मनोज बेलसरे, प्रदीप गौर, सुनिल बेलखोडे, इन्तियाज, हर्ष अग्रवाल, प्रदीप किरण, युगल शेलोकर, प्रांजली चित्रिव, मनिषा बोराडे, रुपाली पाल, स्नेहल पन्नासे, इन्तियाज, ऋषाली शेंद्रे, पंकज अभ्यंकर, मनीष भेंगरा, अनिवेष बडोले, पंचबुधे, स्वरुपा धाबर्डे यांनी अथक परिश्रम घेतले.