नागपूर विद्यापीठात अनोखे आयोजन : कचऱ्यातून उमटणार कलाविष्काराचे सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:32 PM2019-12-10T23:32:23+5:302019-12-10T23:34:06+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘कचऱ्यातून कला’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Unique event at Nagpur University: The beauty of artistic art emerged from the waste | नागपूर विद्यापीठात अनोखे आयोजन : कचऱ्यातून उमटणार कलाविष्काराचे सौंदर्य

नागपूर विद्यापीठात अनोखे आयोजन : कचऱ्यातून उमटणार कलाविष्काराचे सौंदर्य

googlenewsNext
ठळक मुद्देकला कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘कचऱ्यातून कला’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विभागातील विद्यार्थ्यांना अडगळीतील कचऱ्यातून एकाहून एक सरस कलाकृती साकारण्याची संधी मिळणार आहे. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ.दीपक खिरवडकर, कुलसचिव डॉ.नीरज खटी, डॉ.ढोबळे, डॉ.स्नेहा देशपांडे, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विभागप्रमुख डॉ.मुक्तादेवी मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विभागात अशा प्रकारचे हे पहिलेच आयोजन आहे असे त्यांनी सांगितले. कुलगुरूंनीदेखील मागील ४० वर्षांच्या कारकिर्दीत विद्यापीठात अशा प्रकारची कार्यशाळा प्रथमच पाहत असल्याचे सांगितले. विद्यापीठातील ‘स्क्रॅप’चा वापर विधायक कलाकृती तयार करण्यासाठी होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेसाठी विभागातील सर्व शाखांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. डॉ.मोहिते, प्रा.सदानंद चौधरी, डॉ.हरीश वाळके, डॉ.स्नेहल लिमये, डॉ.अमोल गुल्हाणे, प्रा.मौक्तिक काटे, प्रा.महेश मानकर, प्रा.दीपक सोरते, प्रा.रुचिता अट्याळकर, प्रा.मनोज चोपडे हे कलाकार म्हणून आहेत. तर याला डॉ.रवि हरिदास, प्रा.सुमित भोयर, डॉ.संयुक्ता थोरात यांचे सहकार्य लाभले आहेत. मिलिंद लिंबेकर व अभिषेक चौरसिया हे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ही कार्यशाळा १६ डिसेंबरपर्यंत चालणार असून सर्वांना ती पाहण्यासाठी खुली आहे.

Web Title: Unique event at Nagpur University: The beauty of artistic art emerged from the waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.