चारस्तरीय वाहतूक व्यवस्थेचा अनोखा नमुना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:28+5:302021-04-21T04:08:28+5:30
नागपूर : महामेट्रोच्या रिच-२ कॉरिडोरअंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंतचे काम वेगात सुरू असून व्हायडक्ट ७८ टक्के तर सात ...
नागपूर : महामेट्रोच्या रिच-२ कॉरिडोरअंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंतचे काम वेगात सुरू असून व्हायडक्ट ७८ टक्के तर सात स्टेशनचे सरासरी काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावर रूळ टाकण्यात येत आहेत. शिवाय कामठी मार्गावर डबल डेकर उड्डाणपुलाचे काम सुरू असून अनोखा नमूना आहे. या मार्गावर डिसेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे.
या मार्गावर चार स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. रिच-२ मार्ग ७.३० किमी असून, झिरो माइल, कस्तुरचंद पार्क, गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक अशा सात मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. चार स्तरीय वाहतूक व्यवस्थेत पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग, दुसरा रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या व चौथ्या स्तरावर उड्डाण पूल व मेट्रो मार्ग आहे. हा मार्ग उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा आहे.
प्रस्तावित उड्डाणपूल व मेट्रो ट्रॅक याला ‘राइट ऑफ वे’ म्हणतात. या दोन संरचनेचे निर्माण कार्य एका सिंगल पिलरवर होणार आहे. त्यामुळे किंमत आणि रस्त्यावरील जागेचा कमी उपयोग होईल उड्डाणपूल एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत आहे. चार स्तरीय वाहतूक व्यवस्थेत कामठी रोड, नागपूर-भोपाळ रेल्वे लाइन, उड्डाणपूल आणि मेट्रो व्हायाडक्ट आहे. मेट्रो व्हायाडक्टची सर्वांत जास्त १४.९ मीटर उंची गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ आहे. तिसऱ्या स्तरावरील चारपदरी उड्डाणपुलाची रुंदी ७.५० मीटर राहील. तांत्रिकदृष्ट्या १४०० मेट्रिक टन वजनाचे (८० मीटर स्पॅन) स्टील कंपोझिट ट्रस गर्डर रेल्वे ट्रॅकवर योग्य पद्धतीने ठेवल्या जाईल. आरओबीची उंची रस्त्यापासून २५ मीटर एवढी आहे.