कोलंबिया विद्यापीठात निनादेल ‘बोल इंडिया जयभीम’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 10:16 PM2019-02-02T22:16:43+5:302019-02-02T22:19:15+5:30

उपराजधानीचे लेखक व चित्रपट दिग्दर्शक सुबोध नागदेवे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बोले इंडिया जयभीम’ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे आयोजित पहिल्या दलित फिल्म अ‍ॅन्ड कल्चरल फेस्टिव्हलमध्ये त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासोबत नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाचे प्रदर्शनही या महोत्सवात होणार आहे.

At the University of Columbia, alarm 'Bol India Jai Bhim' | कोलंबिया विद्यापीठात निनादेल ‘बोल इंडिया जयभीम’ 

कोलंबिया विद्यापीठात निनादेल ‘बोल इंडिया जयभीम’ 

Next
ठळक मुद्देनागपूरचे नागदेवे यांचा सन्मान : अमेरिकेत पहिला दलित फिल्म फेस्टिव्हल

लोकमत न्यूज नेटवर्क       
नागपूर : उपराजधानीचे लेखक व चित्रपट दिग्दर्शक सुबोध नागदेवे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बोले इंडिया जयभीम’ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे आयोजित पहिल्या दलित फिल्म अ‍ॅन्ड कल्चरल फेस्टिव्हलमध्ये त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासोबत नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाचे प्रदर्शनही या महोत्सवात होणार आहे.
यूएस आंबेडकराईट्स, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन यांच्यावतीने येत्या २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी हा महोत्सव होणार आहे. याअंतर्गत भारतातून चित्रपट सादर करण्याचे आवाहन संस्थांतर्फे करण्यात आले होते. त्यात देशातून ४० निर्मात्यांनी चित्रपट सादर केले होते व त्यातून सात चित्रपटांची निवड करण्यात आली. यामध्ये बोले इंडिया जयभीम व फॅन्ड्रीसह नागराज यांचाच ‘पिस्तुल्या’ तसेच ‘मसान’, रजनीकांत यांचा ‘काला’ आणि इतर भाषेतील ‘पॅपिल्लो बुद्धा, पेरियेरम पेरुमल’ या चित्रपटांचा समोवश आहे. २३ रोजी कोलंबिया विद्यापीठ आणि २४ रोजी दि न्यू स्कूल, न्यूयॉर्क येथे या चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार आहे. याशिवाय ‘बी.आर. आंबेडकर नाऊ अ‍ॅन्ड देन, काकूस, वूई हॅव नॉट कम हिअर टू डाय, गांधी : अनटचेबल्स अ‍ॅन्ड मी, दि बॅटल ऑफ भीमा कोरेगाव, दालन सिरीज : नेपाळ’ या माहितीपटांचेही (डॉक्युमेंटरीज) सादरीकरण यावेळी केले जाणार आहे. त्यानंतर प्रेक्षक व तज्ज्ञांच्या उपस्थितीत या चित्रपटांच्या दिग्दर्शकांच्या मुलाखती होणार आहेत. या महोत्सवासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच दिग्दर्शक पा. रंजित व अभिनेत्री निहारिका सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ब्ल्यू थंडर फिल्म प्रॉडक्शन आणि चंद्रपूरच्या गायत्री फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती आणि सुबोध नागदेवे यांचे लेखन दिग्दर्शन असलेल्या ‘बोले इंडिया जयभीम' हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला आहे. पहिल्यांदा ‘जयभीम’ या अभिवादनाचे प्रवर्तक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनातील सैनिक बाबू हरदास एल. एन. यांच्या आयुष्याची गाथा आणि चळवळीच्या क्रांतीचा इतिहास या चित्रपटातून साकारला आहे. राज्यभरात या चित्रपटाला गौरविण्यात आले असून, नागदेवे यांच्या कामाचेही कौतुक होत आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता बाबू हरिदास एल. एन. यांचे कार्य समाजासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. आता ही निर्मिती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचेल याचा आनंद नक्कीच आहे. अमेरिकेला जाऊन हा चित्रपट आणि आंबेडकरी चळवळीबाबत भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
सुबोध नागदेवे,
दिग्दर्शक, बोले इंडिया जयभीम.

Web Title: At the University of Columbia, alarm 'Bol India Jai Bhim'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.