विद्यापीठ शिक्षण मंचची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:08 AM2021-04-23T04:08:25+5:302021-04-23T04:08:25+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा कार्यकारिणीत युवकांना प्राधान्य देण्यात ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा कार्यकारिणीत युवकांना प्राधान्य देण्यात आले असून, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रदीप खेडकर यांनी ही घोषणा केली. डॉ. कल्पना पांडे यांच्याकडे अध्यक्षपद तर डॉ. सतीश चाफले यांच्याकडे महामंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. २०२२ साली होणाऱ्या विद्यापीठाच्या निवडणुका लक्षात घेता कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी डॉ. दत्तात्रय वाटमोडे, डॉ. संजय कवीश्वर, डॉ. अनंत पांडे, डॉ. अभिविलास नखाते, डॉ. निरंजन देशकर, डॉ. आसावरी दुर्गे, डॉ. राजकुमार डहाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहसचिव म्हणून डॉ. सुरेंद्र गोळे, डॉ. फिरोज हैदरी, डॉ. मारुती वाघ, डॉ. राजेश गादेवार, डॉ. दीपक मसराम यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी डॉ. लक्ष्मीकांत देशपांडे, महिला प्रमुख म्हणून डॉ. अमिशी अरोरा, कार्यालय मंत्रिपदी डॉ. देवराव नंदनवार तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. देवमन कामंडी व डॉ. संतोष गिऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहराध्यक्षपदी प्राचार्य डॉ. संतोष कसबेकर तर सचिव म्हणून डॉ. तुषार शेंडे यांच्याकडे जबाबदारी आहे. याशिवाय डॉ. नंदा भुरे (महिला प्रमुख), डॉ. दत्तात्रय वाटमोडे (नागपूर ग्रामीण अध्यक्ष), डॉ. संजय टेकाडे (सचिव), डॉ. शालिनी साखरकर (ग्रामीण महिला प्रमुख) डॉ. अजय मोहबन्शी (भंडारा जिल्हाध्यक्ष), डॉ. अमित गायधने (सचिव), डॉ. पांडुरंग डांगे (गोंदिया जिल्हाध्यक्ष), डॉ. नीलकंठ लंजे (सचिव), डॉ. उज्ज्वल गुल्हाने (वर्धा जिल्हाध्यक्ष), डॉ. गंजीवाले (सचिव) यांची नियुक्ती झाली आहे.