‘मॉरिस’चे गौडबंगाल शोधणार विद्यापीठ

By Admin | Published: June 24, 2016 03:00 AM2016-06-24T03:00:01+5:302016-06-24T03:00:01+5:30

वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेत (जुने मॉरिस कॉलेज) संस्कृत विभागातील विद्यार्थिनींनी प्राध्यापकाविरोधातच केलेल्या ....

University of Morris' search for Godbangal | ‘मॉरिस’चे गौडबंगाल शोधणार विद्यापीठ

‘मॉरिस’चे गौडबंगाल शोधणार विद्यापीठ

googlenewsNext

चौकशी समिती गठित : विद्यार्थिनींच्या तक्रारीची गंभीर दखल
नागपूर : वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेत (जुने मॉरिस कॉलेज) संस्कृत विभागातील विद्यार्थिनींनी
प्राध्यापकाविरोधातच केलेल्या पोलीस तक्रारीमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या प्रकरणाला गंभीरतेने घेतले असून, यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हे वृत्त प्रकाशित केले होते.
तक्रारकर्त्या विद्यार्थिनी एम.ए. (संस्कृत) शेवटच्या वर्षात या संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्कृत विभागाचे विभागप्रमुख डॉ. ओमकुमार टोम्पे यांच्याकडून वर्षभर चुकीची वागणूक देण्यात आली, असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. आपणास मी परीक्षेत अनुत्तीर्ण करील, अशी सातत्याने धमकी टोम्पे यांच्याकडून देण्यात येत होती.
मात्र शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनी गप्प बसल्या. परंतु या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या इंटर्नल परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थिनींनी संस्थेचे संचालक डॉ. भाऊ दायदार यांच्याकडे दाद मागितली. तेथूनही तत्काळ कार्यवाही न झाल्याने मागील शुक्रवारी विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केली होती.
यासंदर्भात संस्थेकडून अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आली व चौकशी सुरू आहे. परंतु प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, नागपूर विद्यापीठाने चार सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीतील सदस्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. हे सदस्य पुढील आठवड्यात संस्थेत जाऊन चौकशी करणार आहेत व विद्यापीठाला विस्तृत अहवाल सादर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. जर या चौकशीत संंबंधित प्राध्यापक दोषी आढळले तर त्यांना परीक्षेच्या कामातून कायमस्वरूपी ‘डिबार’ करण्यात येईल, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली.(प्रतिनिधी)

Web Title: University of Morris' search for Godbangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.