शत्रूच्या स्थितीचा आढावा घेणारे मानवरहित वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:29 AM2020-07-01T00:29:39+5:302020-07-01T00:32:03+5:30
शत्रूच्या प्रांतातील डेटा गोळा करणे, गोपनीय महिती बेस स्टेशनला परत पाठविणे हे काम मनुष्यबळ वापरून करणे बरेचदा अशक्य असते. हेच काम व्यक्ती हजर न राहता करणे शक्य होऊ शकते. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करणारे मानवरहित वाहन विकसित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शत्रूच्या प्रांतातील डेटा गोळा करणे, गोपनीय महिती बेस स्टेशनला परत पाठविणे हे काम मनुष्यबळ वापरून करणे बरेचदा अशक्य असते. हेच काम व्यक्ती हजर न राहता करणे शक्य होऊ शकते. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करणारे मानवरहित वाहन विकसित केले आहे.
असुविधाजनक आणि अधिक धोका असलेल्या अनुप्रयोगांसाठी मानवरहित भू वाहने वापरणे शक्य आहे. या ठिकाणी मानवी आॅपरेटर वापरणे अशक्य असते. अशावेळी मानवरहित गोष्टीचा उपयोग करणे गरजेचे असते. जे.डी. अभियायांत्रिकी आणि व्यवस्थपन महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी असे मानवरहित वाहन विकसित केले आहे. प्रा. गायत्री पडोळे, प्रा. शैलेश साखरे, प्रकल्प समान्यवयक व विभाग प्रमुख नितू ज्ञानचंदनी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे सदस्य अभिजित कैकाडे, अनुराग दहिवले, अप्रतिम कायरकर, खुशबू राव, संदेश जनबंधू, रोहन सातपैसे यांनी हे वाहन विकसित केले आहे. या वाहनाचा उपयोग हेरगिरी करण्यासह वातावरणाचे निरीक्षण करण्याचे कामी होईल. या वाहनात सेन्सर्स असतील, वेगवेगळ्या स्टेशनवर आॅपरेटरला ही माहिती पुरवतील आणि दूरध्वनीद्वारे हे वाहन नियंत्रित करण्यात येईल. शहरी लढाऊ परिस्थिती, प्रतिकूल क्रियाकलापांची पाहणी करणे, मार्गाचा मागोवा घेणे, दिलेला भौगोलिक समन्वय शोधणे आणि बेस स्टेशनला गोळा केलेला डेटा परत पाठविणे शक्य होईल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.