मुलावर अनैसर्गिक अत्याचार : आरोपीला १० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 08:32 PM2019-02-25T20:32:45+5:302019-02-25T20:33:52+5:30

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६० दिवस अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील आहे.

Unnatural offenses against the child: 10 years imprisonment for the accused | मुलावर अनैसर्गिक अत्याचार : आरोपीला १० वर्षे कारावास

मुलावर अनैसर्गिक अत्याचार : आरोपीला १० वर्षे कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६० दिवस अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील आहे.
सिद्धार्थ देवीदास बनकर असे आरोपीचे नाव असून, तो जयताळा येथील रहिवासी आहे. आरोपीने २०१५ ते २०१६ या कालावधीत नऊ वर्षीय मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात १४ सप्टेंबर २०१६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले.

 

 

Web Title: Unnatural offenses against the child: 10 years imprisonment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.