स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश भोयर यांची अविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:19+5:302021-03-06T04:08:19+5:30

नागपूर : मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपचे उमेदवार प्रकाश भोयर यांची अविरोध निवड करण्यात आली. मनपा मुख्यालयात आयोजित ...

Unopposed election of Prakash Bhoyar as the Chairman of the Standing Committee | स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश भोयर यांची अविरोध निवड

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश भोयर यांची अविरोध निवड

Next

नागपूर : मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपचे उमेदवार प्रकाश भोयर यांची अविरोध निवड करण्यात आली. मनपा मुख्यालयात आयोजित निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पाडली. भोयर वगळता कुठल्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांचे अविरोध निवडून येणे निश्चित होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.

प्रकाश भोयर हे पहिल्यांदाच मनपा निवडणूक जिंकून आले आहेत. यापूर्वी त्यांनी लक्ष्मीनगर झोनचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. झोनस्तरावर काम होत नसल्याबद्दल त्यांनी अनेकदा सभागृहात आवाजही उचलला. परंतु आता मनपा तिजोरीची चावी त्यांच्यात हातात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कार्यकुशलतेची आता परीक्षा होईल. गेल्या दीड वर्षापासून मनपात विकास कामे पूर्णपणे बंद आहेत. कोरोना संसर्गामुळे सध्याचे अध्यक्ष विजय झलके यांनी ऑक्टोबरमध्ये २,७३१ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला होता. बजेटला दोन महिन्यानंतर आयुक्तांनी मंजुरी प्रदान केली. परंतु त्यावर अद्याप अंमल होऊ शकलेला नाही. आता आयुक्त मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बजेट सादर करतील. अशा परिस्थितीत स्थायी समितीच्या बजेटमध्ये ५०० कोटी रुपयाची कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोयर यांना बजेट सादर करणे सोपे जाणार नाही. येणाऱ्या वर्षात मनपाच्या निवडणुका आहेत. विकास कामाच्या भरवशावर प्रत्येक पक्ष निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छितात. परंतु विकास कामेच बंद आहेत. अशा परिस्थितीत नगरसेवकांना स्वत: काम करण्याचे आव्हान आहे.

बॉक्स

शनिवारचे पदग्रहण स्थगित

प्रकाश भोयर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा पदभार उद्या शनिवारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी दुपारी निवडणूक प्रक्रिया पार पडताच मनपा मुख्यालयात मंडप सजू लागले. खुर्च्या लावण्यात आल्या. शनिवारी दुपारी ४ वाजताची वेळ ठरली. यानंतर पत्रकारांशी चर्चा होणार होती. परंतु शनिवार व रविवारी प्रशासनाने बंदचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत पदग्रहण समारंभ करणे योग्य होणार नाही, ही बाब भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नंतर लक्षात आली. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता सोमवारी साध्या पद्धतीनेच पदग्रहण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Unopposed election of Prakash Bhoyar as the Chairman of the Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.