असंघटित श्रमिकांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:54 PM2018-10-02T18:54:45+5:302018-10-02T18:59:56+5:30
असंघटित श्रमिक अंगमेहनत करून काम करतो. त्यांच्या श्रमाला किंमत नाही, आठवड्याची सुटी नाही, पगारवाढ नाही, मुलांना शिक्षण नाही, आरोग्य सुविधा नाही, वृद्धापणाची सोय नाही. अशावेळी त्यांचे जगणे आणि कुटुंब पोसणे अवघड झाले आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी असंघटित श्रमिकांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे, असा सूर सर्व वक्त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ मोलकरीण संघटनेच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी असंघटित श्रमिक, कायदे आणि सरकारचे धोरण याविषयी चर्चा करण्यासाठी कामगार संघटनांची संवाद सभा आयोजित करण्यात आली. कामगार भवन, बैद्यनाथ चौक येथे झालेल्या संवाद सभेत प्रामुख्याने उपस्थित डॉ. रूपा कुलकर्णी, गुरप्रीत सिंग,अशोक दगडे, दीपक चौधरी, मुकुंद मुळे, सिद्धार्थ प्रभुणे, लक्ष्मीकांत तांगडे, विलास भोंगाडे, शीला बोरकर, वैशाली बन्सोड, ममता पाल, शांता बरसागडे, सुरेखा डोंगरे, ममता बाराहते यांनी आपले विचार मांडले. असंघटित श्रमिक अंगमेहनत करून काम करतो. त्यांच्या श्रमाला किंमत नाही, आठवड्याची सुटी नाही, पगारवाढ नाही, मुलांना शिक्षण नाही, आरोग्य सुविधा नाही, वृद्धापणाची सोय नाही. अशावेळी त्यांचे जगणे आणि कुटुंब पोसणे अवघड झाले आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी असंघटित श्रमिकांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे, असा सूर सर्व वक्त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन सुजाता भोंगाडे यांनी केले. सरिता जुनघरे यांनी आभार मानले. संवाद सभेच्या आयोजनात नीलिमा कांबळे, अश्विनी भारद्वाज, रोशनी गंभीर, राजश्री मेश्राम, पुष्पलता शेंडे आदींचा सहभाग होता.