कर्ज न घेताच भरा हप्ता

By admin | Published: August 21, 2015 03:19 AM2015-08-21T03:19:25+5:302015-08-21T03:19:25+5:30

बनावट पॅनकार्ड बनविणाऱ्या टोळीकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे या टोळीने परस्पर दुसऱ्याच्या नावावर कर्जाच्या रूपाने महागड्या वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे.

Unpaid installment | कर्ज न घेताच भरा हप्ता

कर्ज न घेताच भरा हप्ता

Next

बनावट पॅनकार्ड बनविणाऱ्या टोळीचे कृत्य : खासगी वित्तीय संस्थेतील अधिकाऱ्याला हादरा
नरेश डोंगरे  नागपूर
बनावट पॅनकार्ड बनविणाऱ्या टोळीकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे या टोळीने परस्पर दुसऱ्याच्या नावावर कर्जाच्या रूपाने महागड्या वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. सुयोगनगरातील एका खाजगी वित्तीय संस्थेतील अधिकाऱ्याच्या नावाने अशाच प्रकारे ४८ हजारांचा मोबाईल या टोळीतील सदस्याने खरेदी केला आहे. कर्जाचा हप्ता भरण्यासंबंधीचे सूचनापत्र संबंधित अधिकाऱ्याला मिळाल्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला.
विशेष म्हणजे, हा गंभीर प्रकार तातडीने उघड होण्याचे संकेत असतानाही पोलिसांनी मात्र मख्खपणाची भूमिका अवलंबल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे.
भूपेश राजाराम हेडावू (रा. सुयोगनगर) हे एका खासगी वित्तीय संस्थेत कार्यरत आहेत. २६ जुलैला त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. प्रारंभीच अभिनंदन करणाऱ्या या मेसेजमध्ये त्यांनी बजाज फायनान्सकडून घेतलेल्या ४८ हजार रुपयांच्या कर्जाची माहिती नमूद करण्यात आली होती. त्यांना परतफेडीसाठी दरमहा ४८०० रुपये किस्त भरावी लागणार होती. या मेसेजमुळे हेडावू हादरले.
कर्ज न घेताच किस्त भरण्यासंबंधीची सूचना करण्यात आल्यामुळे त्यांनी बजाज फायनान्स लिमिटेडकडे चौकशी केली असता त्यांना आणखी एक धक्का बसला.
पोलीस गप्प का?
हेडावू यांनी या प्रकरणाची तक्रार बजाज फायनान्स आणि वेडोम्ससोबतच अंबाझरी ठाण्यात ७ आॅगस्टलाच केली आहे. मात्र, दोन आठवडे होऊनही यासंबंधाने पोलिसांनी कोणती कारवाई केली ते कळायला मार्ग नाही. बोगस पॅनकार्ड बनवून अशाच प्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या या टोळीला विकत घेतलेल्या मोबाईलच्या ट्रॅकिंगच्या आधारे सहज पकडू शकतात. मात्र, पोलीस गप्प का बसले आहेत, ते कळायला मार्ग नाही.
या बनावट कर्ज प्रकरणात हेडावू यांना विक्रांत शुक्ला नामक तरुणावर संशय आहे. दीड वर्षांपूर्वी हेडावू यांनी बजाज फायनान्सकडून फ्रीज आणि मायक्रोेव्हेव खरेदी केला होता. कर्जाच्या हप्त्यांमध्ये प्रत्येक महिन्याला १५० ते २०० रुपये जास्त घेतले जात असल्यामुळे त्यांनी ही केस हाताळणाऱ्या विक्रांत शुक्लाला सूचना केली. त्यांनी संपूर्ण कर्ज परतफेडीनंतर उर्वरित रक्कम कापून घेऊ असे सांगितले. कर्जाची रक्कम संपल्यानंतर तसे झालेही. यावेळी ईएमआय कार्ड डिस्ट्रॉय करू असे शुक्लाने सांगितले होते. मात्र, ते नष्ट न करता ते ईएमआय कार्ड आणि बनावट पॅनकार्डच्या आधारे महागड्या आय फोनचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात शुक्लाकडे संशयाची सुई वळली आहे.

Web Title: Unpaid installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.