लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल फ्रीडम रनला अपूर्व प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:19 AM2020-08-04T03:19:05+5:302020-08-04T03:19:37+5:30
कोविड-१९ मुळे अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी व्हर्च्युअल रन किती लोकप्रिय ठरतो आहे, हे या उपक्रमाने दाखवून दिले. मॅरेथॉन रनर्स, हौशीने धावणारे किंवा आरोग्यविषयक जागरूक असणारे सगळेच लोक या स्पर्धेत धावले.
नागपूर : लोकमत मीडियातर्फे रविवार, दि. २ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल फ्रीडम रनला संपूर्ण महाराष्ट्रातूनच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आरोग्यविषयी जनजागृती करणाऱ्या आणि घरी राहूनच आरोग्य सांभाळणे कसे शक्य आहे, हे दर्शविणाºया या उपक्रमात जवळपास १० हजारांपेक्षाही अधिक जण सहभागी झाले होते.
कोविड-१९ मुळे अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी व्हर्च्युअल रन किती लोकप्रिय ठरतो आहे, हे या उपक्रमाने दाखवून दिले. मॅरेथॉन रनर्स, हौशीने धावणारे किंवा आरोग्यविषयक जागरूक असणारे सगळेच लोक या स्पर्धेत धावले. सर्वांसाठी खुल्या असणाºया या स्पर्धेला आबालवृद्धांचा मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. रविवारी स. ८ वा. रिलॅक्स झीलतर्फे घेण्यात आलेल्या वॉर्मअपने उपक्रमाची सुरुवात झाली. यानंतर स. ८.१५ वा. लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, महामॅरेथॉन रेस डायरेक्टर संजय पाटील, नगर रायझिंग ग्रुपचे संचालक नरेंद्र फिरोदिया, पुणे येथील ऐेश्वर्यम ग्रुपचे संचालक सतीश अग्रवाल, भारताचे पहिले अंध आयर्नमॅन निकेत दलाल यांनी ध्वज फडकावून स्पर्धेची सुरुवात केली.
लोकमत महामॅरेथॉनचा
स्तुत्य उपक्रम
लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल फ्रीडम रन हा अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करून लोकमत समूहाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. फिट आणि निरोगी राहणे, ही सध्याच्या काळाची गरज आहे. मी स्वत: पुणे येथील महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो. या स्पर्धेत फ्लॅग आॅफ करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे.
- निकेत दलाल, भारताचे
पहिले अंध आयर्नमॅन
३, ५ आणि १० किमी
अशा तीन प्रकारे ही स्पर्धा झाली. आपल्या गच्चीवर, अंगणात, मैदानात धावून लोकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. धावताना प्रत्येकाच्या चेहºयावर असणारा उत्साह उपक्रमाची लोकप्रियता सांगून गेला. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकालाच आॅनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.