पंचाहत्तरीच्या देशाचे अस्थिर, अस्वस्थ तारुण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:10 AM2021-08-15T04:10:49+5:302021-08-15T04:10:49+5:30

नागपूर : भारत हा तरुणांचा देश आहे म्हणून अभिमान बाळगायचा की त्यांची स्वप्नं अपूर्णच असल्याची खंत. तरुण पिढी वर्तमान ...

The unstable, restless youth of the country of seventy-five | पंचाहत्तरीच्या देशाचे अस्थिर, अस्वस्थ तारुण्य

पंचाहत्तरीच्या देशाचे अस्थिर, अस्वस्थ तारुण्य

Next

नागपूर : भारत हा तरुणांचा देश आहे म्हणून अभिमान बाळगायचा की त्यांची स्वप्नं अपूर्णच असल्याची खंत. तरुण पिढी वर्तमान जगताना भविष्याचा वेध घेणारी आहे. मात्र या वर्तमानात राेजगाराचा प्रश्न भेडसावत असेल, महिलांना सुरक्षेसाठी अस्थिर, अस्वस्थ वाटत असेल तर महासत्तेची स्वप्नं दूर आहेत, असेच म्हणावे लागेल.

देशाने माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाने केलेली प्रगती नेत्रदीपक आहे. मात्र तंत्रज्ञानाची प्रगती म्हणजे विकास नाही. माहिती तंत्रज्ञानाचं युग असतानाही देशात वाढत्या बेरोजगारीचे भीषण संकट आहे. ग्रामीण भागात पोटापाण्याचे प्रश्न अजूनही भेडसावत आहेत.

- आकाश मुरलीधर टाले, विद्यार्थी

---------------------------------------------------------

आज स्त्री ही नेतृत्वकर्ती झालेली बघायला मिळत आहे. स्त्रिया गावगाडा सांभाळण्यापासून देश सांभाळत आहेत. देशात स्त्रीला सुरक्षा आहे म्हणूनच कॉल सेंटरला, वैद्यकीय क्षेत्रात, हॉटेल व्यवसायात अशा अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावत आहे.

- विशाखा गणोरकर, विद्यार्थिनी

------------------------------------------------------------

जगात कुठल्याही देशात नाही एवढे जाती, धर्म, पंथांचे लोक भारतात एकत्रितपणे राहतात. यापेक्षा दुसरे अभिमानास्पद काही असू शकत नाही. घाम गाळणारे शेतकरी, सीमेवर पहारा देणारे सैनिक, आरोग्याचे आव्हान पेलणारे डॉक्टर्स, नर्सेस, २४ तास कर्तव्यावर असणारे पोलीस हे सारे अभिमानास्पद आहे.

- मोनाली भोईटे, विद्यार्थिनी

----------------------------------------------

मताधिकारासाठी युरोप, अमेरिकेसारख्या प्रगत देशातील महिलांनाही संघर्ष करावा लागला, जो भारतीय संविधानाने स्त्रियांना सहज दिला. एवढेच नाही तर आचार-विचारांचे स्वातंत्र्यही दिले आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीनेही महिला धास्तावलेल्या असतात. कुठलेही पाऊल उचलण्याआधी आपल्या सुरक्षेचा विचार करावा लागतो. हे चित्र बदलणे गरजेचे आहे.

- रागिणी वेणी, नोकरीपेशा महिला.

-------------------------------------------------------

स्वातंत्र्यानंतर औद्योगिक विकासाला चालना देण्यात आली. पण आताच्या सरकारने शेती आणि कृषीवर आधारित उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. अनेक युवक उच्चशिक्षित आहेत; पण त्यांना रोजगार नाहीत. सर्वांना नोकऱ्या देणे शक्य नाही. त्यामुळे व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे.

मधुर बंग, युवा उद्योजक

-------------------------------------------------

स्वातंत्र्योत्तर भारतात भेदभाव न ठेवता सर्वांना समान मताचा संविधानिक अधिकार मिळाला. मताधिकारामुळे सरकार निवडीत महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. संविधानाने आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिले. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केले आहे. मात्र स्त्रियांना सुरक्षेच्या बाबतीत चिंता करावी लागते, ही बाब योग्य नाही.

- आरती नाईक, गृहिणी

----------------------------------------------

नॉर्थ-इस्टमधून प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी मिळवलेले ऑलिम्पिकमधील मेडल हे संघर्षातील यशाचे प्रतीक आहे. देशामध्ये सध्या ग्रीन एनर्जीवर आणि रस्ते बळकटी करण्याच्या गुंतवणुकीवर अधिक भर दिला जात आहे. तळागाळातील माणसांना सुद्धा आपला हक्क मागण्याचा अधिकार देशात आहे.

- श्रेयस बिंड, विद्यार्थी

--------------------------------------

आज असा भारत दिसतो जो गरिबी, भ्रष्टाचार, सांप्रदायिक तणाव आदींमुळे त्रस्त आहे. आजची तरुण पिढी हीच एकमात्र माध्यम आहे. आपल्या या महान भारतराष्ट्रचा वारसा पुढे नेण्याचे. त्यांनी भारताचा इतिहास जाणून इतर लोकांना जागरूक केले पाहिजे आणि एकत्र काम करून एक चांगला आणि आनंदी भारत बनवायला पाहिजे.

- ऋतुजा बरडे, विद्यार्थिनी.

Web Title: The unstable, restless youth of the country of seventy-five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.