गोदाकाठ परिसरात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 06:53 PM2021-04-14T18:53:35+5:302021-04-14T18:53:35+5:30
चांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी (दि. १४) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ढग दाटून येत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कांदा, गहू पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
चांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी (दि. १४) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ढग दाटून येत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कांदा, गहू पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या कांदे काढणीचा काळ असल्याने अनेक शेतकरी कांदे काढून शेतात पोळ बनवून तात्पुरत्या स्वरूपात साठवत आहेत. मात्र अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांची कांदा व गहू झाकण्यासाठी एकच धांदल उडाली.
अनेक ठिकाणी द्राक्ष बाग काढण्याच्या स्थितीत आहे. या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गोदाकाठच्या काही भागात पावसासोबत वादळी वारे वाहात असल्याने गहू जमीनदोस्त झाला आहे. (१४ रेन)