आर्मी पोस्टल सर्व्हिसद्वारे ‘माय स्पेशल स्टॅम्प’चे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 11:12 AM2021-10-17T11:12:11+5:302021-10-17T15:08:08+5:30

राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे निमित्त, प्रहार समाज जागृती संस्थेसाठी दुहेरी आनंददायी ठरले कारण प्रहारच्या महान कार्याची ओळख व आठवण म्हणून आर्मी पोस्टल सर्विस, कामठीद्वारे प्रहारवर 'माय स्पेशल स्टॅम्प' या निमित्ताने नुकताच अनावरीत करण्यात आला.

Unveiling of 'My Special Stamp' by Army Postal Service | आर्मी पोस्टल सर्व्हिसद्वारे ‘माय स्पेशल स्टॅम्प’चे अनावरण

आर्मी पोस्टल सर्व्हिसद्वारे ‘माय स्पेशल स्टॅम्प’चे अनावरण

googlenewsNext

नागपूर : आर्मी पोस्टल सर्व्हिस, कामठीच्यावतीने प्रहार जनजागृती संस्थेच्या कार्याचा गौरव म्हणून ‘माय स्पेशल स्टॅम्प’चे अनावरण करण्यात आले. 

प्रहार समाज जागृती संस्थेने २७ वर्षे युवकांमध्ये आणि समाजात सैनिक गुण प्रसारित करण्याचे कार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे संरक्षण दलांसाठी आतापावेतो ३०९ प्रहारी अधिकारी म्हणून तयार करून भारतीय सैन्यात पाठविलेले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात कर्नल विनोद कुमार, विंग कमांडर, आर्मी पोस्टल सर्व्हिस, कामठी यांच्या प्रास्ताविकाने झाली. कर्नल विनोद यांनी उपस्थितांना संवादापेक्षाही टपाल सेवेचे महत्त्व कसे जास्त चांगले आहे हे समजावून सांगत आणि कोविडच्या कठीण काळात टपाल सेवेने दिलेल्या आवश्यक व समर्पक कामगिरीची ओळख करून दिली.

प्रहार डिफेन्स अकादमीच्या विद्यार्थ्यांना यावेळेस टपाल सेवेच्या वस्तूंच्या सुरेख प्रदर्शनामधील सुगंधित टपाल तिकिटे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. बी आर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावरील टपाल तिकीट दाखविण्यात आले तसेच आर्मी पोस्टल सर्व्हिसचा इतिहास, कार्य, कामगिरी यावर एक संक्षिप्त चित्रफीत दाखविल्या गेली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे, प्रहारच्या अध्यक्ष शमा देशपांडे, फ्लाईड लेफ्टनंट शिवाली देशपांडे (निवृत्त), चंद्रकांत देव, लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध देशपांडे (निवृत्त) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विंग कमांडर कर्नल विनोद कुमार यांनी केले.

Web Title: Unveiling of 'My Special Stamp' by Army Postal Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.