उपराजधानीती थरारक हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:14+5:302021-06-22T04:07:14+5:30
कोराडी - १८ ऑगस्ट २०२० डॉ. सुषमा राणे हिने मुलगा ध्रुव, मुलगी लावण्या आणि पती धीरज राणे यांना जेवणातून ...
कोराडी - १८ ऑगस्ट २०२० डॉ. सुषमा राणे हिने मुलगा ध्रुव, मुलगी लावण्या आणि पती धीरज राणे यांना जेवणातून विषाक्त इंजेक्शन टोचले. त्यांची हत्या करून स्वत: गळफास लावून आत्महत्या केली होती.
---
नंदनवन - १० जून २०१८
विवेक पालटकर नामक आरोपीने त्याचा स्वत:चा मुलगा कृष्णा, सख्खी बहीण अर्चना पवनकर, भाची वेदांती, जावई कमलाकर आणि त्यांची आई मीराबाई पवनकर या पाच जणांची हत्या केली होती.
---
तहसील
साधारणत: ८ ते १० वर्षांपूर्वी बिहारचे मूळ निवासी असलेल्या एका कुटुंबातील महिलेने पती आणि मुलाला विषाक्त भोजन देऊन त्यांची हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या केली होती.
---
गिट्टीखदान - डिसेंबर २०२०
लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०. रा. हजारी पहाड) आणि यश मोहन धुर्वे (वय १०) या आजी-नात्याची हत्या करून एका अल्पवयीन आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केली होती.
---