नागपूर मनपा आरोग्य केंद्रांचे ‘अपग्रेडेशन’थांबले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:58 AM2019-11-25T10:58:27+5:302019-11-25T11:01:15+5:30
टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे.
गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील गरीब रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी महापालिके चा आरोग्य विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात २०१७ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार टाटा ट्रस्ट राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) शहरातील आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन करत आहे. अत्याधुनिकीकरण करण्यात आलेल्या केंद्रात गरजूंना माफक दरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे.
महापालिकेची तीन आंतररुग्णालये आहेत. यात इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल व पाचपावली सुतिकागृहाचा समावेश आहे. दोन बाह्य रुग्णालये असून यात सदर रोगनिदान केंद्र, महाल येथील रोग निदान कें द्राचा समावेश आहे. सात अॅलोपॅथी व दहा आयुर्वेदिक, तीन होमिओपॅथी, तीन युनानी दवाखाने आहेत.
एक प्राकृतिक चिकि त्सा केंद्र तर एक पंचकर्म चिकि त्सा केंद्र आहे. रुग्णालयांचा व्याप मोठा आहे. परंतु डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. प्रभारी डॉक्टरांच्या बळावर कारभार सुरू आहे. तसेच सुविधांचाही अभाव असल्याने उत्तम दर्जाचे उपचार मिळेल, अशी अपेक्षा करता येणार नाही. टाटा ट्रस्टच्या उपक्रमामुळे शहरातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु प्रस्तावित आठ आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पाचे काम मागील काही महिन्यापासून थांबले आहे. वास्तविक टाटा ट्रस्टला जागा उपलब्ध केल्या असत्या तर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असते. पुन्हा नवीन आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन व्हावे, यासाठी आग्रह धरता आला असता. आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाच्या सुविधा मिळण्याची शक्यता दिसत आहे. दुसरीकडे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळत असतानाही जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पदाधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही.
१८ केंद्रांचे गतीने झाले काम
करारानुसार टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्र अत्याधुनिक होणार होते. पहिल्या व दुसºया टप्प्यात १८ आरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाल्याने अत्याधुनिकीकरणाचे काम गतीने झाले. मात्र तिसºया टप्प्यातील आठ आरोग्य केंद्रासाठी मागील सहा-सात महिन्यात जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे काम रखडल्याने २०२० पर्यत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नाही.
मनपाच्या जागा वापराविना पडून
शहराच्या विविध भागात महापालिकेच्या जागा वापराविना पडून आहेत. बंद पडलेल्या शाळांची संख्या ५० च्या आसपास आहे. या जागा तशाच पडून असून काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. काही झोन कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी नासुप्रच्या जागा आहेत. दुसरीकडे महापालिकेकडून जागा उपलब्ध होत नसल्याने आरोग्य केंद्राचे अत्याधुनिकीकरण थांबले आहे. यामुळे महापालिक ा नागरिकांच्या आरोग्याविषयी किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो.
३८ हजार रुग्णांची माहिती संकलित
टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अपगे्रड करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात सुसज्ज इमारत, ओपीडी कक्ष, सीसीटीव्ही, टीव्ही, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. पिण्याचे पाणी, शौंचालये अशा मूलभूत सुविधा आहेत. माफक दरात रुग्णांना गंभीर आजारावर उपचार मिळत आहे. विशेष म्हणजे येथे येणाºया रुग्णांचा रेकॉर्ड तयार केला जातो. आजवर यात ३८ रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामुळे त्यांना कोणत्याही आरोग्य केंद्रातून उपचार मिळणे शक्य झाले आहे.