८१ वर्षांच्या वृद्ध महिलेस दिला ‘अप्पर बर्थ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:04 PM2019-03-19T13:04:38+5:302019-03-19T13:05:01+5:30

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये अजब कारभार सुरू असून ज्येष्ठ नागरिकांना खालील बर्थ देण्याऐवजी ते वाचवून वरील बर्थ देऊन त्यांची थट्टा करण्यात येत आहे.

'Upper Birth' given to 81-year-old woman | ८१ वर्षांच्या वृद्ध महिलेस दिला ‘अप्पर बर्थ’

८१ वर्षांच्या वृद्ध महिलेस दिला ‘अप्पर बर्थ’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये अजब कारभार सुरू असून ज्येष्ठ नागरिकांना खालील बर्थ देण्याऐवजी ते वाचवून वरील बर्थ देऊन त्यांची थट्टा करण्यात येत आहे. नागपुरातून जबलपुरला जाणाऱ्या एका ८१ वर्षाच्या वृद्ध प्रवासी महिलेस अप्पर बर्थ देऊन रेल्वे प्रशासनाने आपला अजब कारभार उघडकीस आणला आहे. विजया डबली (८१) या ज्येष्ठ महिला प्रवासी यांनी आपला मुलगा प्रवीण डबलीसह १८ मार्चला नागपूरवरून जबलपूरला जाण्यासाठी १२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्ये आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बुक केले. त्यांचा पीएनआर क्रमांक ८६१७०३३११४ होता. यात त्यांना एस ६ कोचमध्ये ३० व ३२ क्रमांकाचा बर्थ देण्यात आला. यात विजया डबली यांना साईड अप्पर बर्थ देण्यात आला. ज्या वेळी तिकीट बुकिंग करण्यात आली त्यावेळी जवळपास १४० ते १४५ बर्थ रिकामे असल्याची माहिती वेबसाईटवर देण्यात येत होती. त्यांनी तिकीट रद्द केले, त्यांना तिकिटाची रक्कम मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी आरक्षण कार्यालयात काऊंटरवरून तिकीट खरेदी केले. येथेही ५९ वेटिंग होते. एवढेच नव्हे तर जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसचे २१ मार्चचे परतीचे तिकीट काढले. या दरम्यान १०४ बर्थ उपलब्ध असल्याची माहिती वेबसाईटवर दिल्यानंतरही विजया डबली यांना २७ क्रमांकाचा अप्पर बर्थ देण्यात आला. त्यांनी आरक्षणाच्या फॉर्ममध्ये ज्येष्ठ नागरिक असे नमूद केले होते. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे माजी रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण डबली यांनी या घटनेबाबत सांगितले की, तत्काळ रिझर्व्हेशनपूर्वी प्रवाशांना बर्थबाबत विचारणा केल्यास प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत.

 

 

 

 

Web Title: 'Upper Birth' given to 81-year-old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.