कोंढाळी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:39+5:302021-06-18T04:07:39+5:30
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन कोंढाळी : गत २० वर्षात कोंढाळी आणि परिसरातील गावांचा विस्तार वाढला आहे. मात्र ...
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन
कोंढाळी : गत २० वर्षात कोंढाळी आणि परिसरातील गावांचा विस्तार वाढला आहे. मात्र आजही या गावातील नागरिकांना लहानसहान शासकीय कामासाठी काटोल येथेच जावे लागते. त्यामुळे कोंढाळी येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाची स्थापना करावी, अशी मागणी जि.प.सदस्य सलील देशमुख यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना एका निवेदनाद्वारे केली.
कोंढाळीला तालुक्याचा दर्जा द्यावा,अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. कोंढाळी भागात मोठ्या संख्येत आदिवासी गावे आहे. त्यामुळे कोंढाळीला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी शिफारस काही वर्षापूर्वी राज्यपालाद्वारे निर्मित समितीने केली होती. मात्र नंतर हा विषय मागे पडला. कोंढाळी आणि काटोल परिसरातील गावांचा विस्तार लक्षात घेता नागरिकांच्या सोईसाठी कोंढाळी येथेही नियमित अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, ग्राम पंचायत सदस्य संजय राऊत, सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे ,आकाश गजबे यांनीही केली आहे.