‘अर्बन मोबिलिटी’मुळे शहरांचा शाश्वत विकास शक्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:30 AM2018-11-03T10:30:44+5:302018-11-03T10:31:15+5:30

देशभरातील शहरी लोकसंख्येत होणारी वाढ, खासगी वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे होणारे प्रदूषण यातून मार्ग काढण्यासाठी अर्बन मोबिलिटी (एकात्मिक परिवहन व्यवस्था) उपयुक्त ठरते आहे.

'Urban Mobility' enables sustainable development of cities; Chief Minister Devendra Fadnavis | ‘अर्बन मोबिलिटी’मुळे शहरांचा शाश्वत विकास शक्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘अर्बन मोबिलिटी’मुळे शहरांचा शाश्वत विकास शक्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्दे ११ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स व एक्स्पोचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरातील शहरी लोकसंख्येत होणारी वाढ, खासगी वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे होणारे प्रदूषण यातून मार्ग काढण्यासाठी अर्बन मोबिलिटी (एकात्मिक परिवहन व्यवस्था) उपयुक्त ठरते आहे. यातून शहराचा शाश्वत विकास शक्य होईल, त्या दिशेने महाराष्ट्र सरकार काम करीत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, ई-बसेस व अन्य पर्यायी इंधनाचा उपयोग करून प्रदूषण कमी करणारी आणि सर्वसामान्यांना परवडणारी परिवहन व्यवस्था उभी करण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू आहे. यासाठी ११ वी अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स मदतगार ठरेल. या तीन दिवसीय कॉन्फरन्समध्ये अर्बन मोबिलिटीवर होणाऱ्या मंथनातून निघणाºया निष्कर्षातून वाहतूक व्यवस्था आणखी चांगली करण्यासाठी सरकार निश्चित प्रयत्न क रेल.
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयातर्फे व महामेट्रोच्या सहकार्याने सिव्हिल लाईन येथील चिटणवीस सेंटरमध्ये ‘ग्रीन अर्बन मोबिलिटी’ या विषयावर आयोजित ११ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्सच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय भूजल परिवहन, राजमार्ग व जहाजरानी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर जिग्लर, जर्मनीचे राजदूत डॉ. मार्टिन ने, केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मेट्रो कॅरिडोर अंतर्गत ५७० किमी अंतर्गत ४०० किमीच्या कामाला मंजुरी दिली आहे. यात २६० किमीचे काम सुरू झाले असून, नागपूर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. हे सर्व मेट्रो प्रोजेक्ट वेळेवर साकार होईल.
फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर जिग्लर यांनी शाश्वत विकासासाठी शहरात बहुआयामी परिवहन व्यवस्था उभी करण्यावर जोर दिला. ते म्हणाले की, भारत व फ्रान्समध्ये या दिशेने काम सुरू आहे.
फ्रान्सच्या कंपन्या जास्तीत जास्त गुंतवणूक करीत आहे. इलेक्ट्रिक वाहन, चार्जिंग स्टेशनसाठी या कंपन्या मनपाशी चर्चा करीत आहेत. नागपूर मेट्रोमध्ये फ्रान्सच्या एएफडी कंपनीने गुंतवणूक केली आहे. यातून निश्चितच लक्षात येते फ्रान्स व भारताचे नाते मजबूत आहे.
जर्मनीचे राजदूत डॉ. मार्टिन ने म्हणाले की, भारतातील नागपूर हे शहर अर्थव्यवस्थेचे केंद्र बनण्याकडे अग्रेसर होत आहे. नागपूर निश्चित ग्रीन अर्बन मोबिलिटीमध्ये भविष्यात एक दीपस्तंभ ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्गा शंकर मिश्रा यांनी केले. आभार डॉ. बृजेश दीक्षित यांनी मानले. या कॉन्फरन्समध्ये देश-विदेशातून १२०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. कॉन्फरन्सच्या उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांनी अर्बन मोबिलिटी इंडिया एक्स्पोमध्ये विविध शहरात झालेल्या मेट्रो प्रोजेक्टच्या स्टॉलची माहिती घेतली. यावेळी हॅकथॉनचेही उद्घाटन करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक्स बायोफ्युएल वाहन वेळेची गरज - गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, कच्च्या तेल्याच्या वाढत्या किमती व वाहनांचे वाढते प्रदूषणाचा पर्याय म्हणून मास रॅपिड ट्रान्सपोर्ट अंतर्गत इलेक्ट्रिक व बायो फ्युएलवर आधारित वाहनांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. मंत्रालयाकडून त्या दिशेने पावले उचलली जात आहे. इलेक्ट्रिक बस, टॅक्सी, बाईक यांना परवानगीपासून मुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे बायोफ्युएल आधारित बस, आॅटो रिक्षा, ई-बाईक परमिटची गरज लागणार नाही. महामेट्रो नागपुरात १० मिलियन चौरस फुटामध्ये निर्माण कार्य करीत आहे. यातून मिळणारे १० हजार कोटी रुपयातून अर्धी रक्कम मनपाला दिली जाणार आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नागपूरमध्ये ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवेचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येत आहे. देशातील काही शहरांमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट सुद्धा वाढविण्यात येत आहे. ८० टक्के ट्रॅफिक नॅशनल हायवेवर डायव्हर्ट केली जात आहे. मुंबई, पुणे, गुवाहाटीला ४० इथेनॉल आधारित बसेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होणार आहे.

मोठ्या शहरात हायस्पिड कनेक्टिव्हिटी - हरदीपसिंह पुरी
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी परिवहन व्यवस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. वेगाने वाढणारे शहर आणि नागरीकरणामुळे शहरात वाहनांची संख्या वाढते आहे. प्रदूषणावर आळा घालण्यासाठी बायो फ्युएल चांगला स्रोत ठरते आहे. त्याच आधारावर वाहने बनविणे आवश्यक आहे. मेट्रोमुळे नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल होणार आहे. आर्थिक, सामाजिक व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनविणे गरजेचे आहे. मोठ्या शहरामध्ये हायस्पिड कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Web Title: 'Urban Mobility' enables sustainable development of cities; Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.