विद्यापीठात उर्दू भाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:51+5:302020-12-08T04:08:51+5:30
कामठी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उर्दू भाषा प्राध्यापक व विभाग प्रमुखाचे पद रिक्त आहे. रिक्त पद ...
कामठी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उर्दू भाषा प्राध्यापक व विभाग प्रमुखाचे पद रिक्त आहे. रिक्त पद तातडीने भरण्याची मागणी अल मिल्लत मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या वतीने राज्य सरकारला पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
वाढत्या अपघातांना ब्रेक लावा
मेंढला : भारसिंगी ते जलालखेडा येथील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. वाहनचालक वर्दळीच्या ठिकाणाहून भरधाव वाहन चालविताना दिसतात. यावर स्थानिक पोलिसांनी निर्बंध घालावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नरखेडच्या तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
अधीक्षक बदलले पण पाटी कायम
कळमेश्वर : कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमरिश मोहबे यांची दोन महिन्यापूर्वी गोंदिया येथे बदली झाली आहे. मात्र कळमेश्वर येथील कार्यालयात त्यांच्या नावाची पाटी कायम आहे. मोहबे यांच्या जागेवर डॉ. कांचन वीरखेडे यांना अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध
रेवराल : केंद्र सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत मौदा तालुक्यातील १२ हून अधिक शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला आहे. नवीन कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी या संघटनांच्या वतीने मौदा येथे निदर्शने करण्यात आली.