नागपुरात फळ पिकविण्यासाठी चायना पावडरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:24 PM2018-05-11T22:24:02+5:302018-05-11T22:24:25+5:30

कळमना बाजारात फळ पिकविण्यासाठी आता चायना पावडरचा उपयोग करण्यात येत आहे. पूर्वी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर फळ पिकविण्यासाठी होत होता. परंतु या पावडरमुळे कॅन्सरचा धोका होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. आता त्या जागी चायना पावडर आले आहे. चायना पावडरने पिकविण्यात येणाऱ्या फळांच्या सेवनाने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही, अद्यापतरी याचा खुलासा झाला नाही.

Use of Chinese powder to make fruit ripe in Nagpur | नागपुरात फळ पिकविण्यासाठी चायना पावडरचा वापर

नागपुरात फळ पिकविण्यासाठी चायना पावडरचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देकॅल्शियम कार्बाईडच्या जागी फळांच्या पेट्यांमध्ये चायना पावडरच्या पुड्यागेल्या आठवड्यात एफडीएने घेतले सॅम्पल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना बाजारात फळ पिकविण्यासाठी आता चायना पावडरचा उपयोग करण्यात येत आहे. पूर्वी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर फळ पिकविण्यासाठी होत होता. परंतु या पावडरमुळे कॅन्सरचा धोका होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. आता त्या जागी चायना पावडर आले आहे. चायना पावडरने पिकविण्यात येणाऱ्या फळांच्या सेवनाने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही, अद्यापतरी याचा खुलासा झाला नाही. तरीसुद्धा अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी चायना पावडरने पिकविलेली फळे सेवन केल्याने आरोग्यास धोका होत नसल्याचा दावा करीत आहे. परंतु एफडीएने पाच दिवसांपूर्वी पोलिसांच्या मदतीने कळमना बाजारातील काही फळ विक्रेत्यांकडून चायना पावडर व पिकविण्यात आलेल्या फळांचे सॅम्पल घेतले. हे सॅम्पल एफडीएने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहे.
लोकमतला चायना पावडरमुळे फळ पिकविण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यासंदर्भात लोकमतच्या टीमने शुक्रवारी कळमना फळ बाजारात सर्व्हे केला. तिथे आंब्याची छाननी केल्यानंतर आंबे प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवून चायना पावडरच्या तीन पुड्या टाकण्यात येत होता. काही फळ व्यापारी आंब्याच्या ढिगाऱ्याजवळ बसून छाननी करीत होते. प्रत्येकाजवळ पिवळ्या रंगाचे पॅकीट होते. प्लास्टीकच्या बॉक्समध्ये आंबे ठेवल्यानंतर त्यात पुड्या टाकण्यात येत होत्या. पिवळ्या पाकीटातील साहित्य संपल्यानंतर फळ व्यापाºयांच्या कार्यालयातून पुन्हा पाकीट मागविण्यात येत होते.
व्यापारी करताहेत चायनाहून पावडरची आयात
सूत्रांच्या मते कळमना बाजारातील एक मोठा फळ व्यापारी चायनातून पावडरची आयात करतो आहे. तो येथे तीन ते चार सब डिलरच्या माध्यमातून फळ विक्रेत्यांना विकतो आहे. किमान १०० रुपये किमतीच्या एका पॅकेटमध्ये चायना पावडरच्या १०० पुड्या असतात.
नकली पावडरचीही विक्री
कॅल्शियम कार्बाईडवर प्रतिबंध असल्याने चायना पावडरची मागणी वाढली आहे. हे बघता काही नकली पावडरचे पाकीटसुद्धा विकल्या जात आहे.
पावडर आरोग्यास घातक नाही
कळमना बाजारात चायना पावडरपासून आंबे पिकविण्यात येत असल्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एम.एस. देशपांडे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, कॅल्शियम कार्बाईडद्वारे पिकविण्यात येणाऱ्या फळामुळे कॅन्सरचा धोका होता. यावर्षी करण्यात आलेल्या तपासात बाजारात कॅल्शियम कार्बाईडचा वापर दिसून येत नाही. त्यांनी चायना पावडरमुळे पिकविण्यात येणारी फळ आरोग्यात घातक नसल्याचा दावा केला आहे. परंतु पाच दिवसांपूर्वी विभागाने कारवाई करून, आंबे व पावडरचे सॅम्पल घेऊन लॅबमध्ये तपासासाठी पाठविले आहे. त्यासंदर्भातील अहवाल अद्यापही प्राप्त व्हायचा आहे. असे असतानाही अधिकारी हे पावडर आरोग्यास घातक नसल्याचा दावा करीत आहे. अनुभवाच्या आधारे हा दावा करीत असल्याचे ते म्हणतात.

Web Title: Use of Chinese powder to make fruit ripe in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.