वीज काटकसरीने वापरा; अन्यथा दिवाळी अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 09:07 PM2021-10-13T21:07:50+5:302021-10-13T21:08:18+5:30

Nagpur News वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Use electricity sparingly; Otherwise Diwali in the dark! | वीज काटकसरीने वापरा; अन्यथा दिवाळी अंधारात !

वीज काटकसरीने वापरा; अन्यथा दिवाळी अंधारात !

Next

नागपूर : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावर वीज टंचाईचे संकट आले आहे. परिस्थिती हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोळशाचा पुरवठाही होऊ लागला असला तरी परिस्थिती अजूनही बिकट आहे. यासोबतच वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Use electricity sparingly; Otherwise Diwali in the dark!)

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील वीज प्रकल्पातील उत्पादन घसरले आहे. यातच दसरा व दिवाळीचा उत्सव आणि उकाडा जाणवू लागल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत वाढल्याने संकट आणखी गडद झाले आहे.

...तर भारनियमन सुरू करावे लागणार

कोळशाच्या पुरवठ्यात हळूहळू वाढ होत आहे. तरीही वीज केंद्रात कोळशाचा साठा समाधानकारक नाही. बहुतांश वीज केंद्रात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही. किंवा कोळशाच्या पुरवठ्यात थोडीही कमतरता आली आणि वीज संच बंद ठेवावे लागले तर भारनियमन सुरु करावे लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

- थकबाकीची डोकेदुखी

नागपूर परिमंडळात तब्बल ६ लाखांवरील वीज ग्राहकांवर तब्बल २५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकीकडे कोळशाचे संकट असताना दुसरीकडे थकबाकीची ही डोकेदुखी आहे वीज बिलाची थकबाकी न मिळाल्याने कोळसा कंपन्यांचे बिल देणे शक्य झाले नाही. परिणामी कोळसा कंपन्यांची थकबाकी ही वाढलेली आहे.

- गरज असेल तेव्हाच दिवे लावा

वीज ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा. गरज असेल तेव्हाच दिवे, पंखे लावावे. असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज जपून वापरा, वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे.

विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीज खरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्यामुळे नागरिकांनीही विजेचा वापर सावधगिरीने करावा.

अमित परांजपे, मुख्य अभियंता, महावितरण

Web Title: Use electricity sparingly; Otherwise Diwali in the dark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज