कापडासह कागद व ज्यूटच्या पिशव्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:38 AM2018-08-06T11:38:21+5:302018-08-06T11:40:36+5:30

प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे.

The use of paper and jute bags with cloth has increased | कापडासह कागद व ज्यूटच्या पिशव्यांचा वापर वाढला

कापडासह कागद व ज्यूटच्या पिशव्यांचा वापर वाढला

googlenewsNext
ठळक मुद्देठोक भाजी घेतल्यास पिशवी नि:शुल्कप्लास्टिक बंदीचा प्रभाव जाणवू लागला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे.
चिल्लरमध्ये जर भाजी घेतली तर ५ ते १० रुपये पिशवीसाठी द्यावे लागतील. काही भाजी विक्रेते तर ग्राहकांकडून पिशवीचे १० रुपये घेत आहे. दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी पिशवी परत केल्यास पैसेही परत देत आहे. अशा पद्धतीने भाजी विक्रेत्यांनी आपापल्या स्तरावर पॉलिथीनचा पर्याय शोधला आहे. काही विक्रेते कागद गुंडाळून भाजी देत आहे, तर काही फळ विक्रेते जूटच्या पिशवीत फळ देत आहे.
भाजी विक्रेता शामबाबू म्हणाले की, जेव्हापासून प्लॅस्टीक बॅन झाले आहे तेव्हापासून कापडाच्या पिशवीचा वापर मी करीत आहे. ठोकमध्ये भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पिशवी नि:शुल्क देत आहे. जर ग्राहक एक-दोन किलो भाजी खरेदी करीत असेल तर त्यांच्याकडून पिशवीचे ५ ते १० रुपये घेत आहे.

कागद व कापड पिशवीचा उपयोग
सहकारनगर येथील भाजी विक्रेते अरुण शाहू म्हणाले की, प्लास्टिकवर बॅन लागल्यानंतर कागद व कापड पिशवीचा उपयोग करण्यात येत आहे. जे लोक ठोकमध्ये भाजी खरेदी करतात, त्यांना पिशवी नि:शुल्क देण्यात येत आहे. पिशवीच्या खरेदीत पैसे अधिक जात असले तरी, आमच्यासाठी पर्याय नाही. ग्राहकांकडे पिशवी नसल्यामुळे आमचेच नुकसान होत आहे. त्यामुळे हा पर्याय योग्य आहे.

पिशवी परत दिल्यास पैसे परत
खामला भाजी बाजारात आलू-कांद्याचे विक्रेते सुजित शाह म्हणाले की, ग्राहकांजवळ पिशवी नसेल तर आम्ही त्यांना पिशवी उपलब्ध करून देतो. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून दहा रुपये घेतो. दुसºया दिवशी जर ग्राहकाने पिशवी परत केली तर आम्ही १० रुपये परतही देतो. ग्राहकांनी जास्त खरेदी केल्यास त्यांना मोठी पिशवी नि:शुल्क देतो. अशाच प्रकारे अमरावती रोडवर एक भाजी विक्रेता ग्राहकांना भाजी खरेदी केल्यावर कापडाची पिशवी देतो. दुसºया दिवशी ग्राहकाने पिशवी परत केल्यास पैसेही परत देतो.

कागदाच्या डब्यामध्ये देतात फळ
खामला बाजारातील फळ विक्रेते आकाश खुबाळकर म्हणाले की, फळाचे वजन जास्त असल्याने कापडाची स्वस्त पिशवी फाटते. त्यामुळे ज्या कागदाच्या डब्यामध्ये फळ आणले जाते. त्याच डब्याचा वापर ग्राहकांना फळ देण्यासाठी करतो. ज्या ग्राहकाने जास्त फळ खरेदी केले त्याच्याकडून डब्याचे पैसेही घेत नाही.

Web Title: The use of paper and jute bags with cloth has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.