१८ रेल्वे स्थानकांवर होणार सौैर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 09:13 PM2018-02-05T21:13:33+5:302018-02-05T21:15:42+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत ग्रीन रुट प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १८ रेल्वे स्थानकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशमान केले जाईल. सौर ऊर्जा युनिट रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यासाठी मेसर्स अजुरे प्रा.लि. या कंपनीसोबत करार करण्यात आल्याची माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्यावतीने देण्यात आली.

Use of solar energy to 18 railway stations | १८ रेल्वे स्थानकांवर होणार सौैर ऊर्जेचा वापर

१८ रेल्वे स्थानकांवर होणार सौैर ऊर्जेचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकल्पासाठी खासगी कंपनीसोबत होणार करार

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत ग्रीन रुट प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १८ रेल्वे स्थानकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशमान केले जाईल. सौर ऊर्जा युनिट रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यासाठी मेसर्स अजुरे प्रा.लि. या कंपनीसोबत करार करण्यात आल्याची माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्यावतीने देण्यात आली.
करारानुसार रेल्वे स्थानकांच्या इमारतीवर ५.७४ कोटी रुपये किमतीचे ८८३ किलोवॅटचे युनिट बसविण्यात येईल. ज्यातून अखंडित वीज पुरवठा होईल. या युनिटमुळे वर्षाकाठी ६७.३ लाख रुपयांची बचत होईल. एक किलोवॅट सोलर प्लांट बसविण्यासाठी ६५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. गत वित्त वर्षात ७८ रेल्वे स्थानकांवर १०० टक्के एलईटी लाईट बसविण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Use of solar energy to 18 railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.