नागपूर मेट्रोसाठी सोलर सिग्नलचा करणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:50 AM2018-03-23T11:50:37+5:302018-03-23T11:50:48+5:30

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने नागपुरात होऊ घातलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने आता आधुनिक सोलर सिग्नल बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

Use of Solar Signals for Nagpur Metro | नागपूर मेट्रोसाठी सोलर सिग्नलचा करणार वापर

नागपूर मेट्रोसाठी सोलर सिग्नलचा करणार वापर

Next
ठळक मुद्देविजेवर चालविण्याची व्यवस्था सक्षम बॅटरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने नागपुरात होऊ घातलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने आता आधुनिक सोलर सिग्नल बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या आधुनिक सोलर सिग्नलच्या माध्यमातून शहरातील रस्ते वाहतुकीत येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न नागपूर मेट्रो करीत आहे.

नागपुरात निर्मिती
सोलर सिग्नल पूर्णपणे नागपुरात तयार केले जाणार असून मेट्रो प्रकल्पासाठी फायद्याचे ठरणार आहे. उच्च दर्जाच्या या सोलर सिग्नलमध्ये वापरण्यात येणारी बॅटरी लॉन्ग परफॉर्मन्ससाठी पुरेपूर उपयुक्त ठरणार आहे. सोलर सिग्नल नैसर्गिकरीत्या स्वयंचलित राहणार आहे. आवश्यकतेनुसार त्यात योग्य ते बदल करता येतील. गरज भासल्यास विजेवर देखील चालवता येतील. त्यासाठी प्रोग्रामिंगची व्यवस्था असेल. तसेच सोलर सिग्नलला चालविणारे सॉफ्टवेअर देखील दिशानिर्देशानुसार बदलता येऊ शकेल.

विषम परिस्थितीत काम करण्याची क्षमता
सोलर सिग्नल १६ वेगवेगळ्या प्रकारे हाताळता येणार आहे. यात मॅन्युअल आणि आॅटोमोड अशा मुख्य दोन प्रकारची सेटिंग आहे. सामान्य माणसालादेखील त्याचे संचालन करता येईल. विशेष म्हणजे या उपकरणात जीपीएस प्रणाली असून या माध्यमानेसुद्धा सिग्नलचे संचालन होणार आहे. अक्षांश व रेखांशच्या आधारे सिग्नलमध्ये बसविण्यात आलेल्या रियल टाइम घड्याळातील वेळ ठरविण्यात येते. सोलर सिग्नलमध्ये तब्बल १६ तास चालणारी १०० वॉट क्षमता असलेली बॅटरी आहे. सिग्नलची उंची जमिनीपासून १२ फूट असून त्यामुळे सिग्नल रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेस अगदी सहजपणे पडतात. सिग्नल ट्रॉलीवर बसविण्यात आले आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतात. सिग्नल आणि ट्रॉलीचे एकत्रित वजन ३०० किलोपेक्षा जास्त आहे. कुठल्याही हवामानात आणि विषम परिस्थितीत काम करण्याची सिग्नलची क्षमता आहे. ते अरुंद रस्त्यावर अतिशय लाभदायक आहेत.

Web Title: Use of Solar Signals for Nagpur Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.