विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती शेतीकरिता उपयुक्त

By admin | Published: January 3, 2016 03:40 AM2016-01-03T03:40:34+5:302016-01-03T03:40:34+5:30

तंत्रज्ञानाच्या माध्यमाने विज्ञानाची सांगड घालून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रतिकृती शेतीकरिता उपयुक्त ठरत आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या ...

Useful for replication of students | विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती शेतीकरिता उपयुक्त

विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती शेतीकरिता उपयुक्त

Next

कामठी : तंत्रज्ञानाच्या माध्यमाने विज्ञानाची सांगड घालून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रतिकृती शेतीकरिता उपयुक्त ठरत आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या मॉडेल्सचा शेतकऱ्यांना लाभ होईल. नैसर्गिक पाणी व इतरही नवनवीन शेतीपयोगी प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार कराव्यात, असे आवाहन स्थानिक नगर परिषदेचे उपाध्यक्ष रणजित सफेलकर यांनी केले.
स्थानिक सरस्वती उच्च प्राथमिक शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार देवराव रडके, शेषमल ओसवाल, माजी नगराध्यक्ष नीरज यादव, शरद कोरेमोरे, नगरसेवक प्रमोद कातोरे, शिक्षण अधिकारी देवगडे, पांडुरंग बागरे, डॉ. विजय रडके, तुषार रडके, श्यामलाल शर्मा, मुख्याध्यापिका रमा नेहारे आदी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध ८० प्रतिकृती सादर केल्या. प्रदर्शनात सादर केलेल्या प्रतिकृतीबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शेतीपयोगी व नैसर्गिक पाणी उपलब्ध होईल, अशा प्रतिकृती निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोयीचे होईल. त्यामुळे शेतकरी प्रगत शेती करण्याकडे वळतील, असाही सूर मान्यवरांनी प्रदर्शनाच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा राखडे यांनी केले. संचालन विजया गोतमारे यांनी तर यादव ढवळे यांनी आभार मानले. विज्ञान प्रदर्शनाकरिता शंकर भुजाडे, समुद्रे, वसंत खुरगे, शंकर पारधी, जयपाल बारसागडे, यादव पाठे, रंजना ठवकर, निर्मला चौधरी, कृष्णा बोडतकर, हारगुडे, कोठारी, कल्पना फुलझेले, मेकलवार, जांगडे, लाभाडे, शिल्पा मस्के, शीतल भोंडे आदींसह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Useful for replication of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.