उत्तमला होती ‘गुरु’ची खुर्ची गमावण्याची भीती ; सुनियोजित पद्धतीने केला चमचमवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 09:21 PM2019-06-05T21:21:47+5:302019-06-05T21:22:43+5:30

तृतीयपंथीयांचे प्रमुख ‘गुरु’ ची खुर्ची गमावण्याचा धोका नजर आल्याने कुख्यात उत्तम बाबा ऊर्फ सेनापती याने प्रतिस्पर्धी चमचम गजभियेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना प्राथमिक चौकशीत उत्तम आणि त्याच्या साथीदाराकडून याबाबत माहिती मिळाली आहे. दरम्यान कळमना पोलिसांनी याप्रकरणात उत्तम आणि त्याच्या दोन साथीदारास अटक केली आहे. आरोपीची संख्या आता एकूण पाच झाली आहे. आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.

Uttam was the fear of losing the chair of the Guru; In a planned manner Uttam assaulted on Chamcham | उत्तमला होती ‘गुरु’ची खुर्ची गमावण्याची भीती ; सुनियोजित पद्धतीने केला चमचमवर हल्ला

उत्तमला होती ‘गुरु’ची खुर्ची गमावण्याची भीती ; सुनियोजित पद्धतीने केला चमचमवर हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तमसह पाच आरोपीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तृतीयपंथीयांचे प्रमुख ‘गुरु’ ची खुर्ची गमावण्याचा धोका नजर आल्याने कुख्यात उत्तम बाबा ऊर्फ सेनापती याने प्रतिस्पर्धी चमचम गजभियेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना प्राथमिक चौकशीत उत्तम आणि त्याच्या साथीदाराकडून याबाबत माहिती मिळाली आहे. दरम्यान कळमना पोलिसांनी याप्रकरणात उत्तम आणि त्याच्या दोन साथीदारास अटक केली आहे. आरोपीची संख्या आता एकूण पाच झाली आहे. आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी कळमन्यातील कामनानगर येथे उत्तम बाबाने साथीदारांच्या मदतीने २५ वर्षीय प्रवीण ऊर्फ चमचम गजभियेवर जीवघेणा हल्ला केला होता. चमचमची हत्या करणे हाच त्यांचा उद्देश होता. परंतु चमचम या हल्ल्यात बचावली. तिची प्रकृती नाजूक आहे. पोलिसांनी घटनेनंतर उत्तमबाबा कलम ऊईके, किरण गौरी याला अटक केली होती. रात्री उशिरा निसार शेख आमि लखन पारशिवनीकर यालाही अटक करण्यात आली. आतापर्यंतच्या तपासात या हल्ल्याचे मुख्य कारण वर्चस्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे. उत्तम बाबाजवळ १०० पेक्षा अधिक तृतीयपंथी आहेत. उत्तम त्यांचा प्रमुख म्हणजे ‘गुरु’ आहे. ते किन्नर लोकांमध्ये फिरून पैसे मागतात. लग्न- साक्षगंध किंवा एखाद्याच्या घरी कुणी जन्माला आला आसेल, आनंदाचा क्षण, सण उत्सादरम्यान पैसे मागण्यासाठी प्रत्येक समूहाला वेगवेगळी जबाबदारी दिली जाते. तेथून होणारी कमाई या समूहाच्या गुरुकडे जमा केली जाते. गुरु प्रत्येकाला त्याचा-त्याचा हिस्सा वाटून देतो. एकप्रकारे गुरुला मॅनेजमेंटच्या नावावर घरबसल्या कमाई होते. याप्रकारचे समूह उत्तमला आपल्या कमाईचा एक ठराविक हिस्सा देतात.
उत्तमनंतर चमचम हीच नंबर दोनवर होती. तिच्याकडे ३० पेक्षा अधिक तृतीयपंथी आहे. ते चमचमला गुरु मानत होते. चमचमला उत्तमच्या खुर्चीवर बसवण्याची त्यांची इच्छा होती. उत्तमलाही चमचम घरबसल्या मालामाल होत असल्याची बाब खटकत होती. तो चमचमशी संबंधित तृतीयपंथीयांवर निर्बंध किंवा आर्थिकं दंड लावत असे. चमचम याचा विरोध करायची. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद सुद्धा झाले होते. या पार्श्वभूमीवर उत्तमने चमचमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा उत्तमने ही बाब स्पष्टपणे नाकारली आहे.

Web Title: Uttam was the fear of losing the chair of the Guru; In a planned manner Uttam assaulted on Chamcham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.