रिक्त पदांमुळे शासकीय कृषी सेवा खिळखिळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:22+5:302021-06-18T04:07:22+5:30
विजय नागपुरे लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शासनाच्या विविध कृषिविषयक याेजनांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने तालुका ...
विजय नागपुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शासनाच्या विविध कृषिविषयक याेजनांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला विशेष महत्त्व आहे. मात्र, कळमेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ५० पैकी १८ पदे रिक्त असल्याने तालुक्यातील कृषी सेवा खिळखिळी झाली आहे. त्यामुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
या कार्यालयात तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, अनुरेखक व शिपाई अशी ५० पदे मंजूर आहेत. काही वर्षापासून यातील १८ पदे रिक्त झाली. ती अद्यापही भरण्यात आली नाहीत. शिपायांची कळमेश्वर कार्यालयातील तीन पैकी दाेन, मोहपा व गोंडखैरी मंडळातील प्रत्येकी एक अशी चार पदे रिक्त आहेत. यातील एक पद सन २०१३ पासून तर तीन पदे २०१५-१६ पासून भरण्यात आली नाही.
येथील वाहनचालकाचे पद १ जुलै २०१९ पासून रिक्त आहे. तालुक्यात चार अनुरेखकांची पदे मंजूर असून, सन २०१६ पासून मोहपा, २०१४ पासून गोंडखैरी व २०१२ व २०१६ पासून कळमेश्वर येथील दोन पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांची २५ पदे मंजूर असली तरी परसोडी (वकील), मोहपा, घोराड, तिष्टी (खुर्द), बोरगाव (बुद्रुक), वरोडा व मढासावंगी येथील प्रत्येही एक याप्रमाणे सात पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या वरिष्ठ लिपिकाचा अतिरिक्त कार्यभार लिपिक राहुल गायकवाड यांचेकडे आहे.
...
कर्मचाऱ्यांची फरफट आणि शेतकऱ्यांची गैरसाेय
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यापासून तर शासकीय याेजनांची माहिती शेतकऱ्यांना देत लाभ मिळवून देण्यापर्यंतची कामे करावी लागतात. अनेक पदे रिक्त असल्याने त्या पदांचा प्रभार इतर कर्मचाऱ्यांकडे साेपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या विभागासाेबतच प्रभार असलेल्या पदाची कामे नियाेजित वेळेत करावी लागतात. यात एकीकडे कर्मचाऱ्यांची फरफट हाेत असून, दुसरीकडे शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे.