कोरोनाला वर्ष होत असतानाही रिक्त पदांचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:11 AM2021-02-21T04:11:23+5:302021-02-21T04:11:23+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाला पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी होत असताना आरोग्य क्षेत्रातील रिक्त पदांचा तिढा अद्यापही सुटलेला ...

Vacancies persist even as Corona gets older | कोरोनाला वर्ष होत असतानाही रिक्त पदांचा तिढा कायम

कोरोनाला वर्ष होत असतानाही रिक्त पदांचा तिढा कायम

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाला पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी होत असताना आरोग्य क्षेत्रातील रिक्त पदांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पूर्व विदर्भातील नागपूरसह, भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर जिल्हा मिळून ३१ टक्के पदे रिक्त आहेत. याचा फटका रुग्णसेवेवर बसत आहे. यातून भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील अग्निकांडासारखे प्रकरण घडत असल्याचे बोलले जात आहे.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. अशा निर्णायक स्थितीत ज्या विभागावर सर्वाधिक कामाचा ताण आहे त्याच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन अडचणीत येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ‘वर्ग १’ ते ‘वर्ग ४’ मिळून ५२५१ पदे मंजूर आहेत. यातील ३५८४ पदे भरली असून १६६७ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक रिक्त पदे ‘वर्ग १’ मधील आहेत. २६० पैकी १३७ पदे म्हणजे ५३ टक्के पदे भरलेलीच नाही. ‘वर्ग २’ मधीलच ‘गट ब’मध्ये २५ टक्के पदे, ‘वर्ग ३’मधील ३७ टक्के, तर ‘वर्ग ४’मधील २९ टक्के पदे रिक्त आहेत.

-गोंदियात ७५ टक्के पदांवर वरिष्ठ अधिकारीच नाहीत

सहा जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात ‘वर्ग १’चे सर्वाधिक पदे रिक्त आहेत. येथे ४० पदे मंजूर असताना १० भरली असून ३० पदे रिक्त आहेत. तब्बल ७५ टक्के पदांवर वरिष्ठ अधिकारीच नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात या संवर्गातील ६४ टक्के, वर्धा जिल्ह्यात ५० टक्के, गडचिरोली जिल्ह्यात ४९ टक्के, भंडारा जिल्ह्यात ४६ टक्के तर सर्वांत कमी नागपूर जिल्ह्यात ३९ टक्के पदे रिक्त आहेत.

-‘वर्ग ३’ची ३७ टक्के पदे रिक्त

‘वर्ग ३’चा कोट्यातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे सरळसेवा भरती करण्याचे आदेश असतानाही सहा जिल्ह्यांत ३७ टक्के पदे रिक्त आहेत. २२६७ पैकी ८८८ पदे भरलेलीच नाहीत. नागपूर जिल्ह्यात ४७१ पैकी ७२, वर्धा जिल्ह्यात ३१६ पैकी ७०, भंडारा जिल्ह्यात ३६७ पैकी १३४, गोंदिया जिल्ह्यात ३६७ पैकी २०४, चंद्रपूर जिल्ह्यात ४६६ पैकी २६२, तर गडचिरोली जिल्ह्यात ३८० पैकी १४६ पदे रिक्त आहेत.

-नागपूर जिल्ह्यात ‘वर्ग ४’ची सर्वाधिक पदे रिक्त

सहा जिल्हे मिळून ‘वर्ग ४’ची १७५५ पदे मंजूर असताना ५२१ पदे रिक्त आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील ३९५ पैकी सर्वाधिक, १३२ पदे रिक्त आहेत. भंडारा जिल्ह्यात ३०९ पैकी ७८, गडचिरोली जिल्ह्यात २४९ पैकी ६३, वर्धा जिल्ह्यात २२५ पैकी ६०, गोंदिया जिल्ह्यात २७६ पैकी ८५ तर चंद्रपूर जिल्ह्यात ३०१ पैकी १०३ पदे रिक्त आहेत.

-पूर्व विदर्भातील एकूण पदांची स्थिती

‘वर्ग १’ पदे

मंजूर भरलेली रिक्त

२६० १२३ १३७

‘वर्ग २’ पदे

५३६ ४९८ ३८

‘वर्ग २’मधील ‘गट ब’पदे

३३३ २५० ८३

‘वर्ग ३’ पदे

२३६७ १४७९ ८८८

‘वर्ग ४’ पदे

१७५५ १२३४ ५२१

Web Title: Vacancies persist even as Corona gets older

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.