शिक्षकांची रिक्त पदे ‘नॅक’च्या परीक्षेतील डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:37+5:302021-09-02T04:18:37+5:30

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘नॅक’च्या मोहिमेची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. ...

Vacancies for teachers are a headache in NAC exams | शिक्षकांची रिक्त पदे ‘नॅक’च्या परीक्षेतील डोकेदुखी

शिक्षकांची रिक्त पदे ‘नॅक’च्या परीक्षेतील डोकेदुखी

Next

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘नॅक’च्या मोहिमेची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. ‘नॅक’च्या दौऱ्यादरम्यान विद्यापीठाला अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. रिक्त पदांची समस्या मोठी असून पदव्युत्तर विभागांत जवळपास अर्ध्या जागांवर पूर्णवेळ शिक्षकच नाही, अशा स्थितीत ही बाब विद्यापीठासाठी डोकेदुखी ठरू शकते.

नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये २४८ मान्यताप्राप्त पदे आहेत. यांपैकी १२८ पदेच भरलेली असून तब्बल ४८.३८ टक्के पदे रिक्त आहेत. यातील काही पदे तर पाच वर्षांहून अधिक कालावधीपासून रिक्त आहेत. असिस्टंट प्रोफेसरची तर ५८ टक्के पदांना भरतीची प्रतीक्षा आहे. पूर्णवेळ शिक्षक नसल्याने कंत्राटी किंवा तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या भरवशावर विद्यापीठाच्या शिक्षणाचा डोलारा उभा आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

विद्यापीठाने २०१९-२० साली ‘नॅक’ला सादर केलेल्या ‘एसएसआर’नुसार नागपूर विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ६४७ तर तांत्रिक कर्मचाऱ्यांची २१७ मान्यताप्राप्त पदे आहेत. त्यांपैकी अनुक्रमे २०३ व ५६ पदे रिक्त आहेत. २०२०-२१ मध्येदेखील अनेक कर्मचारी निवृत्त झाले असून यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.

विद्यापीठातील पदांची स्थिती (२०२० च्या एसएसआर अहवालानुसार)

पद :मान्य पदे: भरलेली पदे

प्रोफेसर : ४२ : ४२

असोसिएट प्रोफेसर: ७५ : ३१

असिस्टंट प्रोफेसर: १३३ : ५५

शिक्षकेतर कर्मचारी: ६४७ : ४४४

तांत्रिक कर्मचारी: २१७ : १६१

पाच वर्षांत केवळ २६ शिक्षकांना ‘फेलोशिप’

नागपूर विद्यापीठातील शिक्षक संशोधनामध्ये माघारलेले आहेत. २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत विद्यापीठातील केवळ २६ शिक्षकांनाच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ‘फेलोशिप’ प्राप्त झाली; तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय किंवा सरकारी संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षकांची संख्या अवघी ३७ इतकी आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षक

वर्ष : शिक्षक

२०१५-१६ : ६

२०१६-१७ : १०

२०१७-१८ : ७

२०१८-१९ : १०

२०१९-२० : ४

फेलोशिपप्राप्त शिक्षक

वर्ष : शिक्षक

२०१५-१६ : ५

२०१६-१७ : ७

२०१७-१८ : ४

२०१८-१९ : ९

२०१९-२० : १

Web Title: Vacancies for teachers are a headache in NAC exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.