रिक्त पदाचा कर वसुलीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:10 AM2021-02-17T04:10:54+5:302021-02-17T04:10:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेत मागील काही वर्षांत नवीन पदभरती झालेली नाही. कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला ...

Vacancy hit tax recovery | रिक्त पदाचा कर वसुलीला फटका

रिक्त पदाचा कर वसुलीला फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेत मागील काही वर्षांत नवीन पदभरती झालेली नाही. कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. सद्यस्थितीत मनपात ६,३८१ पदे रिक्त आहेत. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असताना याचा फटका कर वसुलीला बसला आहे. दुसरीकडे पदभरती होत नसल्याने बेराजगार युवकांना संधी नाकारली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनपामध्ये वर्ग १ ते ४ व सफाई मजूर अशी एकूण १५ हजार ९४३ पदे मंजूर आहेत. यापैकी १० हजार ९०८ पदे भरलेली असून ६ हजार ३८१ पदे रिक्त आहेत. रिक्त पदाची टक्केवारी ३६ टक्क्याच्या आसपास आहे. वर्ग १ मधील १९९ पदापैकी १०३ पदे भरलेली असून ९६ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची ७७ पदे मंजूर असून २३ पदे भरलेली असून ५४ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ ची ३ हजार ७९१ पदे मंजूर असून १ हजार ७५७ पदे भरलेली आहेत, तर २ हजार ३४ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची २ हजार ७५४ पदे मंजूर असून ८९७ पदे भरलेली आहेत, तर १ हजार ८५७ पदे खाली आहेत. सफाई मजुरांची ३ हजार ९४५ पदे मंजूर असून ३ हजार ८६३ पदे भरलेली आहेत, तर ८२ पदे रिक्त आहेत.

...

सहा वर्षात दोन हजार सेवानिवृत्त

२०१४ ते नोव्हेंबर २०२० या सहा वर्षांच्या कालावधीत मनपातील जवळपास दोन हजार कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना काही अटी व शर्तीच्या अधीन संधी देण्यात आली. परंतु ही संख्या २०० च्या आसपास आहे.

....

रिक्त पदे असताना आस्थापना खर्च अधिक?

मनपात सहा हजाराहून अधिक पदे रिक्त असतानाही आस्थापना खर्च मात्र शासन निकषाच्या ३६ टक्क्याहून अधिक आहे. मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना आस्थापना खर्च ६२ टक्क्याच्या आसपास आहे. आस्थापना खर्च अधिक कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

........

रिक्त पदांची आकडेवारी

संवर्गमंजूर पदे रिक्त पदे

वर्ग -१ १९९ ९६

वर्ग -२ ७७ ५४

वर्ग -३ ३७९१ २०३४

शिक्षक ७५५ ००

वर्ग -४ २७५४ १८५७

सफाइं मजदूर ३९४५ ८२

सफाई मजदूर

अधिसंख्यपद ४४०७ २२५८

Web Title: Vacancy hit tax recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.