१२६ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:54+5:302021-03-23T04:09:54+5:30
सावनेर : वाकाेडी (ता. सावनेर) येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने काेराेना लसीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. यात ६० वर्षांवरील ...
सावनेर : वाकाेडी (ता. सावनेर) येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने काेराेना लसीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वर्षे वयाेगटांतील गुंतागुंतीच्या आजारी रुग्णांचे लसीकरण करण्यात येत आहेत. वाकाेडी येथील १२६ जणांचे आजवर लसीकरण करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ.वर्षा शंभरकर यांनी दिली.
गावातील प्रत्येकाला लस मिळावी, म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबत गावातील प्रत्येकाला माहिती व्हावी, म्हणून दवंडी देण्यात आली, शिवाय ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी नागरिकांना ही लस घेण्यास प्राेत्साहित करीत असल्याची माहिती सरपंच मनाेहर जुनघरे यांनी दिली. या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ ते ५९ वर्षे वयाेगटांतील गुंतागुंतीच्या आजाराच्या रुग्णांना प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांनी मनात काेणतीही भीती न बाळगता लसीकरण करवून घ्यावे, असेही डाॅ.वर्षा शंभरकर यांनी सांगितले. लसीकरणाला येतेवेळी, तसेच लसीकरण केल्यानंतर नागरिकांना मास्कचा वापर करीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी (प्रभारी) डाॅ.प्रशांत वाघ यांनी केले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, तालुका आराेग्य अधिकारी (प्रभारी) डाॅ.प्रशांत वाघ, सरपंच मनाेहर जुनघरे, खापा प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.वर्षा शंभरकर, वाकाेडी येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत तेलसे, आराेग्य पर्यवेक्षक मधुकर साेनुने उपस्थित हाेते.