ग्रामीणमध्ये १३ लाख, तर शहरात १७ लाखांवर नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:20+5:302021-09-04T04:11:20+5:30
नागपूर : कोरोना विषाणूच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेचा तडाखा बसूनही जिल्हा आता या आघातातून सावरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या ...
नागपूर : कोरोना विषाणूच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेचा तडाखा बसूनही जिल्हा आता या आघातातून सावरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी तयार होऊ पाहत असतानाच नागरिकांनी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामीणमध्ये १३ लाख, तर शहरात १७ लाखांवर नागरिकांचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे. तरी गरोदर माता, स्तनदा माता, तसेच ज्यांचा दुसरा डोस घेण्याचे प्रमाण कमीच आहे.
२ सप्टेंबरपर्यंत शहरात १२ लाख ८ हजार ९८७ नागरिकांनी पहिला डोस तर ५ लाख १० हजार ८१० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण १७ लाख १९ हजार ७९७ नागरिकांनी लसीकरण केले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राद्वारे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू असून आतापर्यंत भिवापूर- ५३,२३९, हिंगणा- १,४४,१३८, कळमेश्वर- ९०,५९३, कामठी- १,३८,५३९, काटोल- ९९,५७९, कुही- ५९,९७५, मौदा- ७६,८८२, नागपूर ग्रामीण- १,५३,७३७, नररखेड- ८८,६३४, पारशिवणी- ८५,०१३, रामटेक- ६९५१८, सावनेर- १,३८,६६०, उमरेड- १,३०,०४२ असे एकूण १३ लाख २८ हजार ५४९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
बॉक्स
- स्तनदा माता, अपंगांचे प्राधान्याने लसीकरण
जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील अपंग आणि स्तनदा मातांचे सर्वच केंद्रांवर प्राधान्याने लसीकरण होणार आहे. १६० पेक्षा अधिक केंद्रांवर ग्रामीणमध्ये लसीकरण सुरू आहे. उत्सवप्रियता टाळून गौरी, गणपती या सणासुदीच्या काळात नागरिकांनी कोविड सुरक्षा नियमांचे पालन करावे. मास्क, सुरक्षित अंतर व हात धुणे या त्रिसूत्रीला जीवनशैली करावी. यासोबतच लसीकरणाद्वारेच कोरोनाला मात देण्यासाठी कोणताही संकोच, भीती न बाळगता सर्व वयोगटातील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन शासन व प्रशासनाने केले आहे.